पुणे : घटस्फोटासाठी केला होता अर्ज; फक्त 8 दिवसांत...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

मतभेद झाल्याने दीड वर्षापासून विभक्त राहणाऱ्या आयटी क्षेत्रातील उच्चशिक्षित पती-पत्नीला कौटुंबिक न्यायालयाने केवळ आठ दिवसांत परस्पर संमतीने घटस्फोट मंजूर केला आहे.

पुणे : मतभेद झाल्याने दीड वर्षापासून विभक्त राहणाऱ्या आयटी क्षेत्रातील उच्चशिक्षित पती-पत्नीला कौटुंबिक न्यायालयाने केवळ आठ दिवसांत परस्पर संमतीने घटस्फोट मंजूर केला आहे. कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश सुभाष काफरे यांनी याबाबत आदेश दिला आहे. 6 जानेवारी रोजी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने 14 जानेवारी रोजी मंजूर केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दीपक आणि मालती (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांनी ऍड. विक्रांत शिंदे, ऍड. मंगेश कदम आणि ऍड. सौदामिनी जोशी यांच्यामार्फत घटस्फोटासाठी अर्ज केला होता.

दीपक आणि मालती यांचे डिसेंबर 2015 साली पुण्यात लग्न झाले होते. त्यांना कोणतेही आपत्य नाही. दोघांचे पटत नव्हते. अनेक महिने विभक्त राहत असल्याने त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. दोघांमध्ये अटी, शर्ती पूर्तता झाली असल्यामुळे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अमरदीप कौर वि. हरदीप कौर या न्यायनिवाड्याला अनुसरून हा निकाल असल्याचे ऍड. विक्रांत शिंदे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Divorce Application Accepted by Court in 8 days