घटस्फोट मागे : मुलीवरील प्रेमापोटी आई-वडिलांकडून समंजसपणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Divorse

छोट्या छोट्या भांडणातून कौटुंबिक वाद होऊन जोडपे कायमचे विभक्त होत असल्याचे अनेक प्रकार घडत आहेत.

घटस्फोट मागे : मुलीवरील प्रेमापोटी आई-वडिलांकडून समंजसपणा

पुणे - छोट्या छोट्या भांडणातून कौटुंबिक वाद (Family Dispute) होऊन जोडपे (Couple) कायमचे विभक्त (Divorse) होत असल्याचे अनेक प्रकार घडत आहेत. मात्र, हीच छोटी-छोटी कारणे पुन्हा एकत्र येण्यास कारणीभूत ठरू शकता हे नीता आणि रूपेश यांच्याबाबत घडलेल्या घटनेतून स्पष्ट होते. मुलांची भेट ही एकमेकांविषयी सूड उगविण्यासाठी नसते तर त्यातून कौटुंबिक ओलावा निर्माण होऊन रुसवे-फुगवे दूर होऊन वाद मिटू शकता हे यातून अधोरेखित झाले आहे.

या जोडप्याचे गेल्या पाच वर्षांपासून घटस्फोटाचा दावा येथील कौटुंबिक न्यायालयात सुरू होता. मात्र पतीला लागलेला मुलीचा लळा आणि पत्नीनेही दाखवलेला सामंज्यसपणा यामुळे ते पुन्हा एकत्र आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नीता आणि रूपेश (नावे बदललेली) हे दोघेही आयटीमध्ये कामाला आहे. नीता ३४ तर रूपेश हे ३६ वर्षांचे आहेत. त्यांना एक सहा वर्षांची मुलगी आहे. दोघांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न लाखोंच्या घरात. मात्र, कौटुंबिक वादातून त्यांच्यात वाद निर्माण झाले. एकत्र राहणे शक्य नसल्याने रूपेश यांनी पत्नीपासून घटस्फोट मिळण्याचा दावा दाखल केला. रूपेश यांच्यावतीने ॲड. सुनीता जंगम यांनी कामकाज पाहिले.

दाव्याची सुनावणी सुरू असताना दोघांनी संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान रूपेश यांनी मुलीला भेटण्यासाठी वेळ मिळावी, अशी मागणी पत्नीकडे केली होती. मात्र तीने ती नाकारल्याने त्यांनी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने रूपेश यांना मुलीला भेटण्याची वेळ दिली. मुलीच्या भेटीच्या निमित्ताने जोडप्यातील संवाद पुन्हा वाढला. तसेच मुलीचा लळा वाढल्याने नरेश यांनी स्वतंत्र न राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी मने पुन्हा जुळल्याने त्यांनी दावा मागे घेतला.

अंतिम टप्प्यात निकाल बदलला

पतीने दाखल केलेला हा दावा संमतीने घटस्फोट घेऊन निकाल निघण्याच्या टप्प्यात होता. या प्रकरणातील साक्षदेखील पूर्ण झाल्या होत्या. आणखी काही दिवस दोघांमधील वाद सुरू राहिला असता तर ते कायमचे विभक्त झाले असते. मात्र, पूर्वीचा दाव्याचा निकाल बदलला. न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले तर सकारात्मक बाबी घडू शकतात, याचे हे एक उदाहरण असल्याचे ॲड. जंगम म्हणाल्या.

Web Title: Divorce Cancel Reasonableness From Parents For Love Of Daughter

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top