
पुणे : दिव्यांग पार्कमधील दिव्यांग नागरिक उपचार केंद्रास प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन महिन्यांत १३०हून अधिक जणांनी समुपदेशन व विविध उपचार पद्धतींचा लाभ घेतला आहे. प्रारंभी समुपदेशन व त्यानंतर दिव्यांग नागरिक, विशेष मुलांच्या आवश्यकतेनुसार त्यांना उपचार पद्धती दिल्या जात आहेत.