esakal | कतारमध्येही दिवाळीचा जल्लोष
sakal

बोलून बातमी शोधा

कतारमध्येही दिवाळीचा जल्लोष

मराठी कुटुंबांनी कोरोनाच्या काळोखाला दूर सारत प्रकाशाचा हा सण आनंदाने साजरा केला. मूळच्या पुणेकर असलेल्या अनुराधा रेणुसे-भुरुक यांनी घरच्या घरी आकाशकंदील बनवत मराठी कुटुंबांच्या घरात आनंदाचा प्रकाश फुलविला.

कतारमध्येही दिवाळीचा जल्लोष

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - नोकरी-कामानिमित्त परदेशात जावे लागले, तरी मराठी माणूस मराठी संस्कृतीचा गंध घेऊनच जातो. त्याचा प्रत्यय सध्या कतार या देशामध्ये येतो आहे. तेथील मराठी कुटुंबांनी कोरोनाच्या काळोखाला दूर सारत प्रकाशाचा हा सण आनंदाने साजरा केला. मूळच्या पुणेकर असलेल्या अनुराधा रेणुसे-भुरुक यांनी घरच्या घरी आकाशकंदील बनवत मराठी कुटुंबांच्या घरात आनंदाचा प्रकाश फुलविला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनुराधा यांचे पती योगेश हे तेथे एक कंपनीत नोकरीस आहेत. ते कतारमधील अल वकारा या शहरातील एजदान-१० या भागात राहतात. कोरोनामुळे तेथेही काही बंधने आहेत. त्यामुळे दिवाळी साजरी करता येणार का, असे त्यांना वाटत होते. परंतु, घरगुतीस्तरावर दिवाळी साजरी करण्यास परवानगी मिळाली. अनुराधा ‘सकाळ’शी बोलताना म्हणाल्या, ‘कुठेही असले, तरी दिवाळीचा आनंद टाळणे अशक्‍य आहे. त्यामुळे आम्ही हा आनंद परस्परांमध्ये वाटण्याचा प्रयत्न केला. कतारमध्ये भारतीय कुटुंबे खूप आहेत. त्यात मराठी देखील आहेत. त्या सर्वांना दिवाळीचा आनंद द्यावा म्हणून आम्ही घरच्या घरी रंगीबेरंगी आकाशकंदील तयार केले.  दिवाळी सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि सुखाचे रंग भरतो. आकाश कंदील त्याचे प्रतीक म्हणून आम्ही ते तयार करून इतर कुटुंबांना वाटले. त्या प्रत्येकाने घराच्या दारासमोर किंवा खिडकीमध्ये लावले आणि दिवाळीचा एक मौहाल तयार झाला. या सणाच्या आनंदात आकाश कंदिलाच्या रूपाने भर घालता आली याचे समाधान आहे.’

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वैशाली-विशाल बुटाला, प्रतीक्षा-जगदीश पाटील, अपर्णा-सुधीर पाटील, प्रेरणा काळे यांच्यासह अनेक कुटुंबांनी आकाश कंदील लावत, ते या आनंदात सहभागी झाले. दिव्याने दिवा लावू आशेचा, आनंदाचा, ऐश्‍वर्य आणि समृद्धीचा हा उद्देश या आमच्या उपक्रमातून साध्य झाला. दिवाळी मराठी आणि भारतातील इतर राज्यातील मित्र-मैत्रिणी एकत्र येतात. कतारमधील अल बिदा म्हणून एक बाग आहे. या बागेत आम्ही भेटतो. घरी तयार केलेले फराळाचे पदार्थ यांचा आस्वाद घेतो आणि दिवाळीचा जल्लोष करतो. एकत्र येत दिवाळी साजरी करण्याचा आनंद काही औरच आहे, असे रेणुसे यांनी सांगितले.