esakal | पुण्याच्या बाजारपेठेत उत्साहाची दिवाळी ! 
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्याच्या बाजारपेठेत उत्साहाची दिवाळी ! 

लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग अशा कपडे बाजारात आजही गर्दी होती. दिवाळीच्या पावलांनी घराघराच चैतन्य आले आहे. काही महिने कोरोनामुळे निराशेचे वातावरण निवळले आणि बाजारपेठेतही उत्साह संचारला.

पुण्याच्या बाजारपेठेत उत्साहाची दिवाळी ! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही बाजारपेठेतील ग्राहकांचा उत्साह कायम होता. विशेषत: लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग अशा कपडे बाजारात आजही गर्दी होती. दिवाळीच्या पावलांनी घराघराच चैतन्य आले आहे. काही महिने कोरोनामुळे निराशेचे वातावरण निवळले आणि बाजारपेठेतही उत्साह संचारला. दिवाळीच्या काही दिवस आधीच नागरिक सुरक्षेची सर्व काळजी घेत, खरेदीसाठी बाहेर पडू लागले होते. आज लक्ष्मीपूजनापर्यंत कपडे खरेदी सुरू होती.  लहान मुलांचे कपडे, साड्यांच्या दुकानांमध्ये गर्दी दिसून येत होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने सोने-चांदीची खरेदी केली जात होती. त्याचा प्रतिसाद मात्र कमी होता. चांदीचे व्यापारी संजीव गुजर म्हणाले, ""गेल्या वर्षीच्या तुलनेत 70-80 टक्‍क्‍यांनी मार्केट सावरले आहे. परंतु लग्नासारख्या मोठ्या समारंभावर मर्यादा असल्याने खरेदी करण्यावर मर्यादा येत आहेत. लग्नसराई सुरू होण्यापूर्वी या खरेदीचा वेग वाढेल आणि दुकानांमध्येही गर्दी होईल.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मोबाइल मार्केटमध्ये हलचल 
दिवाळीच्या निमित्ताने मोबाइल मार्केटमध्येही गर्दी वाढली आहे. मोबाइल विक्रेता संघाचे संजय शहा यांनी सांगितले, की सध्या दहा ते वीस हजार या किमतीच्या मोबाइलला नागरिक जास्त पसंती देत आहेत. मोबाइल कंपन्यांनी तसेच विक्रेत्यांनी खरेदीवर सवलती आणि बक्षिसे देऊ केल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिवाळी असली, तरी यावर्षी ग्राहक खर्चाची चौकट आखून खरेदीसाठी येत होते. गारमेंटच्या किंमतीतही फार फरक नाही. किमती वाढल्याही नाहीत आणि कमीही झाल्या नाहीत. गेल्या वर्षीपेक्षा साधारणपणे 60 टक्‍क्‍यांपर्यंत गर्दी आहे. आज लक्ष्मीपूजन असल्याने खरेदीसाठी काल गर्दी होती. 
- मनोज सारडा, अध्यक्ष, पुणे जिल्हा रेडिमेड, होजिअरी गारर्मेंट विक्रेता संघ