Video : पैशांचा धूर पाहण्यापेक्षा 'सीड क्रॅकर्स' खरेदी करा अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फटाके

Video : पैशांचा धूर पाहण्यापेक्षा 'सीड क्रॅकर्स' खरेदी करा अन्...

Celebrate Diwali With Seed Crackers : दिवाळीला (Diwali)फटाके फोडणं हा सगळ्यांच्या आवडता छंद, पण या फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणाचा फटका सुद्धा आपल्यालाच बसतो. त्यामुळे यंदाच्या दिवाळीला सीड्स क्रॅकरचा वापर करून ग्रीन दिवाळी साजरी करूया. (Eco Friendly Diwali Celebration)

हे फटाके कुंडीत टाकले आणि त्यावर पाणी टाकलं की झाडं उगवत. हे इकोफ्रेंडली सीड्स क्रॅकर्स असून,. वाढत्या ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणाला (Air Pollution) आळा घालण्याऱ्या फटाक्यांवर एक चांगला तोडगा आहे.

इकोक्रेडल या कंपनीने या सीड क्रॅकर्सची निर्मिती केली असून, हे फाटाके हुबेहूब फटाक्यांसारखे दिसतात. त्यामुळे बच्चे कंपनीच्या चेहऱ्यावर आनंद येणारंच म्हणून समजा. विशेष म्हणजे या फटाक्यांमध्ये दारूगोळयाचा वापर करण्यात आलेला नाही.

Diwali Festival 2022

Diwali Festival 2022

हेही वाचा: Diwali health : फटाके फोडताय ? डोळ्यांना होऊ शकते गंभीर दुखापत; अशी घ्या काळजी

त्याऐवजी यात वेगवगेळ्या बियांचा वापर करण्यात आला आहे. जसे की, भूईचक्रामध्ये कांदा, लक्ष्मीबॉम्बमध्ये काकडी, पाऊस म्हणजे झाडामध्ये चिंच, अशा वेगवगेळ्या बियांचा या फटाक्यांमध्ये टाकण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: Fire Insurance : फायर इन्शुरन्स म्हणजे काय? दिवाळी काळात प्रत्येकाला असावी माहिती

Diwali

Diwali

हे फटाके डायरेक्ट कुंडीत झाड लावतो त्याप्रमाणे लावायचे आणि त्यावर पाणी टाकायचं थोड्याच दिवसात या कुंडीतून छान रोप उगवेल. महत्वाची गोष्ट या फायाक्यांची निर्मिती कंपनीने बचत गटाच्या महिलांकडून करून घेतले आहे. जेणेकरून त्यांच्या कुटुंबियांना दिवाळी देखील गोड होईल.

हेही वाचा: Diwali Alert: दिवाळीच्या दिवसांत 'या' गोष्टींची आवर्जून घ्या का काळजी, अन्यथा जीवाला धोका

हरित (पर्यावरणपूरक) फटाके

हरित (पर्यावरणपूरक) फटाके

त्यामुळे तुम्हीदेखील जागरूक नागरिक म्हणून दारूगोळा असलेल्या फटाक्यांऐवजी सीडयुक्त फटाक्यांनी दिवाळी साजरी करू शकता. जेणेकरून यंदाची दिवाळी ही सुरक्षित आणि प्रदूषण फ्री होईल.