‘मावळे’ अन्‌ आकर्षक किल्ले विक्रीसाठी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

पिंपरी - दिवाळीनिमित्त राजस्थानी कारागिरांनी बनविलेल्या तयार किल्ल्यांना वर्षागणिक मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे मुलांचे घरासमोर किल्ले बनविण्याचे प्रमाण कमी होत असून, बाजारात एक ते तीन फूट उंचीपर्यंतचे आकर्षक किल्ले उपलब्ध होत आहेत. 

पिंपरी - दिवाळीनिमित्त राजस्थानी कारागिरांनी बनविलेल्या तयार किल्ल्यांना वर्षागणिक मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे मुलांचे घरासमोर किल्ले बनविण्याचे प्रमाण कमी होत असून, बाजारात एक ते तीन फूट उंचीपर्यंतचे आकर्षक किल्ले उपलब्ध होत आहेत. 

वाढत्या शहरीकरणामुळे माती, दगड आणि जागा मिळणे दुरापास्त झाले आहे, त्यामुळे टोलेजंग इमारतींच्या छोट्याशा आवारात मातीचे किल्ले साकारण्याऐवजी बाजारातील तयार किल्ले आणून ते सजविण्याकडे मुलांचा कल वाढला आहे. किल्ल्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, तसेच मावळे विक्रीसाठी आले आहेत. मावळ्यांची किंमत डझनावर आहे. लहान आकाराच्या किल्ल्यांची किंमत ८० रुपयांपासून तर शिवनेरी, रायगड, प्रतापगड, तोरणा, सिंहगड, पन्हाळा, विशालगड, हरिश्‍चंद्र गड, राजगडाची प्रतिकृती असलेल्या मोठ्या किल्ल्यांची किंमत १५०० ते ३००० रुपयांपर्यंत असल्याचे विक्रेते काळूराम राठोड यांनी सांगितले. 

राजस्थानी कारागीर दोन महिन्यांपासून किल्ले बनविण्याच्या कामाला सुरवात करतात. शहरात काळेवाडी, रावेत, आळंदी, चिंचवड या भागात रेडिमेड किल्ले विक्रेते मोठ्या प्रमाणावर आहेत. किल्ल्यावर आकर्षक सजावट करून त्याला बुरूज, गुहा, तट, सिंहासन, तसेच प्रवेशद्वारही दाखविले आहे. किल्ले विक्रीतून कारागिरांनाही चांगला रोजगार मिळाला आहे. किरकोळ विक्रेत्यांकडूनही मागणी असते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali festival Attractive castles for sale