esakal | "दिवाळी फराळ' पुस्तकाचे प्रकाशन 
sakal

बोलून बातमी शोधा

"दिवाळी फराळ' पुस्तकाचे प्रकाशन 

सकाळ प्रकाशनाचा वाचक महोत्सव सध्या सुरू असून सकाळ प्रकाशनाची दर्जेदार पुस्तके तीस टक्के सवलतीत उपलब्ध आहेत. दिवाळी फराळ हे 140 रुपये किमतीचे पुस्तक वाचकांना फक्त 100 रुपयांत उपलब्ध होणार आहे.

"दिवाळी फराळ' पुस्तकाचे प्रकाशन 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - दिवाळीनिमित्त घरच्या घरी फराळाचे पदार्थ तयार करण्याचा प्रघात आजही कायम आहे. बदलत्या काळानुसार सगळे नाही; पण एक- दोन पदार्थ तरी घरचेच हवेत, असे अनेकांना वाटते. हे जाणून ज्येष्ठ पाककलातज्ज्ञ जयश्री कुबेरलिखित "दिवाळी फराळ' हे पुस्तक दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सकाळ प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन देसाई बंधू आंबेवाले या उद्योगाचे प्रमुख मंदार देसाई यांच्या हस्ते नुकतेच झाले. या वेळी सकाळ प्रकाशनाच्या संपादिका ऐश्वर्या कुमठेकर आणि विक्री व्यवस्थापक आनंद शिंदे उपस्थित होते. 

या वेळी बोलताना कुबेर यांनी पाककृतींची थोडक्‍यात माहिती दिली, तर मंदार देसाई यांनी देसाई बंधूंचा फराळाचा डबा आणि दिवाळी फराळ हे पुस्तक आकर्षक दिवाळी भेट असल्याचे सांगितले. ऐश्वर्या कुमठेकर यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. 

सकाळ प्रकाशनाचा वाचक महोत्सव सध्या सुरू असून सकाळ प्रकाशनाची दर्जेदार पुस्तके तीस टक्के सवलतीत उपलब्ध आहेत. दिवाळी फराळ हे 140 रुपये किमतीचे पुस्तक वाचकांना फक्त 100 रुपयांत उपलब्ध होणार आहे. या दिवाळीत आपल्या कुटुंबीयांना, आप्तेष्टांना, मित्रपरिवाराला देण्यासाठी संग्राह्य पुस्तक भेटींचा पर्याय स्वीकारावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. ऑनलाइन खरेदीसाठी www.sakalpublications.com/amazon.in/bookganga.com वर लॉग इन करावे आणि अधिक माहितीसाठी बुधवार पेठेतील सकाळ पुस्तक दालनात किंवा 8888849050 या क्रमांकावर संपर्क साधावा.

loading image
go to top