

Maharashtra News Gas Cylinder Explosion During Diwali Burns Household Belongings in Talegaon Dhamdhere Pune District
esakal
तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील जुनानाथ मंदिरा शेजारी असलेल्या वसंत विष्णु शिंदे यांच्या घरातील एचपी सिलेंडरच्या गॅस गळतीमुळे स्फोट होऊन घराला आग लागल्याची दुर्घटना आज रविवारी (ता.८) घडली. गॅसच्या आगीत एक जण जखमी झाले असून, घरातील संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्या आहेत.