दिवाळी खरेदीची लगबग

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी वैयक्तिक पातळीवर काळजी घेतल्याचे दिसत होते. मात्र, अजूनही काही लोक शारीरिक अंतर आणि मास्ककडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत होते.

पुणे - वसुबारस अवघ्या दोन दिवसांवर आल्यामुळे आज दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठ फुललेली होती. सजावटीसाठी लागणारे आवश्‍यक साहित्य, रांगोळी, पणत्या, आकाशकंदील यांसह लक्ष्मीची मूर्ती, पूजेचे साहित्य आदींच्या खरेदीला नागरिकांनी प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्य बाजारपेठेसह स्थानिक ठिकाणी मिळणाऱ्या साहित्याला आणि ऑनलाइन खरेदीला ग्राहकांनी  पसंती दिल्याचे दिसते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी वैयक्तिक पातळीवर काळजी घेतल्याचे दिसत होते. मात्र, अजूनही काही लोक शारीरिक अंतर आणि मास्ककडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत होते. किल्ला बनवायला लागणारे साहित्य तसेच किल्ल्यावरील चित्रे खरेदीसाठी पालकांसह बच्चेकंपनीनेही हजेरी लावली होती. तसेच कपडे खरेदीसाठी आलेली बच्चेकंपनीही दुकानांत दिसत होती. रोषणाईच्या साहित्याबरोबरच घरातील सजावटीचे साहित्य खरेदीलाही महिलावर्गाने प्राधान्य दिल्याचे दिसले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali shopping customers to take care on an individual level to prevent the spread of corona