दिवाळी अंक 'बोलणार' लेखकांच्याच आवाजात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 ऑक्टोबर 2016

पुणे : बोलणारे दिवाळी अंक काही वर्षांपूर्वी सुरू झाले, मात्र तुमच्या आवडत्या साहित्यिकांच्या आवाजातच कथा-कविता ऐकवणारा ऍपवरील दिवाळी अंक यावर्षी प्रथमच तुमच्या भेटीला येतो आहे. तसेच अनेक मान्यवरांची विविध विषयांवरील रोखठोक मतेही हा अंक आपल्यासमोर मांडणार असून, हे सगळे घरबसल्या आणि मोफत उपलब्ध होणार आहे. 

पुणे : बोलणारे दिवाळी अंक काही वर्षांपूर्वी सुरू झाले, मात्र तुमच्या आवडत्या साहित्यिकांच्या आवाजातच कथा-कविता ऐकवणारा ऍपवरील दिवाळी अंक यावर्षी प्रथमच तुमच्या भेटीला येतो आहे. तसेच अनेक मान्यवरांची विविध विषयांवरील रोखठोक मतेही हा अंक आपल्यासमोर मांडणार असून, हे सगळे घरबसल्या आणि मोफत उपलब्ध होणार आहे. 

बाजारात जाऊन दिवाळी अंक विकत आणणे, तो हाताळणे यापेक्षा तुम्हाला घरबसल्या दिवाळी अंक मिळाला तर कोणाला नको असतो. यापेक्षाही नव्या पिढीत साहित्याची आवडही निर्माण व्हावी, हा उद्देश समोर ठेवून 'बुकगंगा' हा दिवाळी अंक तयार करत आहे. 'बुकगंगा'चा ऍप दिवाळीत वाचकांसमोर येणार आहे. त्यावरून हा अंक हव्या त्या वेळी ऐकता येऊ शकणार आहे. 

'बुकगंगा'च्या संचालक गौरी बापट म्हणाल्या, ''ऑडिओ बुक, ऑडिओ दिवाळी अंकानंतरचा हा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. या अंकात दिलीप प्रभावळकर, रामदास फुटाणे, सलिल कुलकर्णी, संदीप खरे, प्रा. मिलिंद जोशी, महेश म्हात्रे, वसंत लिमये, स्पृहा जोशी, आशुतोष जावडेकर यांच्यासह इतरही मान्यवर आहेत. कौशल इनामदार, सई ताम्हनकर, वंदना गुप्ते, आरती अंकलीकर-टिकेकर, संजीव अभ्यंकर असे गायक-कलाकारही यात सहभागी होतील. त्यांच्या दहा ते पंधरा मिनिटांच्या 'क्‍लिप'चा अंक असेल.'' 

'ऍग्रोवन', 'अक्षर अयान', 'अक्षरगंध', 'आवाज', 'भाग्यदीप', 'किशोर', 'जत्रा', 'मिळून साऱ्याजणी', 'मोहिनी', 'अनुभव', 'माऊस', 'नवल', 'इत्यादी', 'हंस', 'गृहशोभा', 'गृहसंकेत', 'छोट्यांचा आवाज', 'कॉमेडी कट्टा' असे वेगवेगळ्या विषयांना वाहिलेले ई-दिवाळी अंकही 'बुकगंगा'ने उपलब्ध करून दिले आहेत. त्यांना आतापासून वाचकांचा प्रतिसादही मिळू लागल्याचे दिसत आहे. 

ऑडिओ दिवाळी अंक ही अभिनव आणि कौतुकास्पद कल्पना आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नव्या पिढीला पुन्हा दिवाळी अंकांकडे वळविण्यासाठी या कल्पनेचा उपयोग होऊ शकतो. 
- ह. मो. मराठे, साहित्यिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali special issues to have Audio versions also