
Diwali Travel
Sakal
अविनाश ढगे
पिंपरी : दिवाळीत रेल्वेने गावी जाण्यासाठी तिकिटांचे बुकिंग करण्याचा प्रयत्न नागरिक करत आहेत. पण, नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षण केव्हाच फुल्ल झाले आहेत. अनेक गाड्यांच्या तिकिटासाठी आताच प्रतीक्षायादी अर्थात ‘वेटिंग’ दिसत आहे. काही मार्गांवरील ‘विशेष ट्रेन’मधील बहुतांश गाड्यांचेही आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे नागरिकांची गावी जाण्यासाठी कसरत अटळ आहे.