पुणेकरांनो, 'हा' रस्ता दुहेरी वाहतुकीसाठी खुला; वाहतूक पोलिसांचा 'ग्रीन सिग्नल'!

Pune-Traffic_police
Pune-Traffic_police

पुणे : फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील ज्ञानेश्‍वर पादुका चौक ते कृषी महाविद्यालयासमोरील वीर चाफेकर चौक हा रस्ता दुहेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. याबाबतची तात्पुरती अधिसूचना वाहतूक शाखेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी काढली आहे.

दरम्यान, वाहतूक शाखेच्या या निर्णयामुळे फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याकडे जाणाऱ्या नागरिकांची होणारी गैरसोय थांबणार आहे. फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता आणि जंगली महाराज रस्ता या दोन्ही रस्त्यांवर वाहतूक शाखेच्या तत्कालीन उपायुक्तांनी एकेरी वाहतुकीचा प्रयोग सुरू केला.

मात्र त्याचवेळी नरवीर तानाजी वाडी, पाटील इस्टेट, मॉडेल कॉलनी व विद्यापीठ रस्त्याने फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना प्रवेश बंद करण्यात आला. त्यामुळे या परिसरातून येणाऱ्या नागरिकांना संचेती रुग्णालय, जंगली महाराज रस्त्यावरील स.गो.बर्वे चौकाला वळसा घालून इच्छितस्थळी जावे लागत होते. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय सुरू होती. याबाबत नागरिकांनी वाहतूक शाखेकडे तक्रारी केल्या होत्या. 

डॉ. शिंदे यांनी शिवाजीनगर वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना या मार्गाचा आणि नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचा अभ्यास करुन अहवाल देण्यास सांगितला. त्यानुसार, संबंधीत अहवालामध्येही नागरिकांची गैरसोय होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, डॉ. शिंदे यांनी नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील ज्ञानेश्‍वर पादुका चौक ते वीर चाफेकर चौक (कृषी महाविद्यालय) येथील एकेरी वाहतुकीची अधिसूचना रद्द केली. तसेच हा रस्ता दुहेरी वाहतुकीसाठी खुला होत असल्याबाबतचची अधिसूचना काढली. 

या वाहतूक बदलाबाबतच्या निर्णयाबाबत काही सूचना असल्यास नागरिकांनी अपर पोलिस आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिसशेजारी, बंगला नं. 6, पुणे 411006 यांच्या कार्यालयात 12 मार्चपर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com