esakal | महाराष्ट्राच्या 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तब्ब्ल दोन महिने लांबणीवर.. 
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्राच्या 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तब्ब्ल दोन महिने लांबणीवर.. 

महाराष्ट्राच्या 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तब्ब्ल दोन महिने लांबणीवर.. 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाविकास आघाडीने शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेला सुरवात केलीये. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारकडून १५ हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या जरी करण्यात आलेल्या. दरम्यान आज या संदर्भातील दुसरी यादी जाहीर करण्यात येणार आहे. मात्र या कर्जमाफीतुन तूर्तास काही जिल्ह्याना वगळण्यात आलं आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणूकांमुळे राज्याच्या सहकार विभागानं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या तब्बल १९ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी तब्ब्ल दोन महिने पुढे ढकलली गेलीये.  आज कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर येणार आहे.

हेही वाचा: अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल मात्र भाजप नेते नेरेन्द्र मेहता फरार 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडी सरकारने  राज्यातल्या १५ हजार शेतकऱ्यांची यादी  केली होती. आज राजतल्या निरनिराळ्या जिल्ह्यात दुरी यादी लावण्यात येणार आहे. मात्र यात काही मोठ्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला नाहीये. येणाऱ्या ग्रामपंचयातींच्या निवडणुकांमुळे या जिल्ह्यांमध्ये अजून पुढचे २ महीने तरी कर्जमाफीची यादी लागणार नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी पुढे ढकलली गेलीये. 

कोणते आहेत हे जिल्हे:    

 1. ठाणे 
 2. अहमदनगर
 3. वर्धा
 4. नागपूर
 5. गडचिरोली
 6. पुणे
 7. नाशिक
 8. रायगड
 9. रत्नागिरी
 10. जळगाव
 11. नंदुरबार 
 12. सातारा 
 13. कोल्हापूर 
 14. औरंगाबाद
 15. नांदेड 
 16. अमरावती
 17. अकोला 
 18. यवतमाळ 
 19. बुलढाणा 

हेही वाचा: बेलापुर खाडीकिनारील आगीतून संशयाचा धूर 

एकूणच महाराष्ट्रातले मोठे जिल्हे या यादीत आहे. त्यामुळे आता या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांना किमान २ महीने कर्जमाफीची वाट पाहावी लागणार आहे.    

farmers from these 19 districts will not get loan waiver benefit for two moths