पुर रेषेचा विचार करुन विकास कामे करा- अजित पवार

ग्लोबल वार्मिंगमुळे अशी संकटे येतात, त्याची आपण खबरदारी घ्यायला हवी.
ajit pawar
ajit pawarSakal Media

कोथरुड : नगरविकास खात्याने ( Urban Development Department) ब्ल्यू आणि रेड लाईनच्या मध्ये निवासीकरण, उद्याने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची माहिती अनेकांना नाही. हे पत्रकारांनी लक्षात आणून देताच अजित पवार (ajit pawar) म्हणाले की, पन्नास वर्षात पुर येतो तेव्हा ब्ल्यू लाईन, रेड लाईन दाखवली जाते. महाड (mahad), चिपळून (chiplun) सारख्या शहरात ठरावीक पातळीपर्यंत पाणी येते तेव्हा जर दहा फुटापर्यंत पाणी येते तेव्हा तेवढे उंच कॉलम घेवून त्याच्यापेक्षा जास्त उंचीवर राहण्याची व्यवस्था करा. जेणेकरुन पुर आला असता, पाण्याला अडथळा येणार नाही, अशा प्रकारे शहराचा विकास करता येतो. चीन (chin), जर्मनीला (germany) कधी नव्हे तेवढा पुर आला. ग्लोबल वार्मिंगमुळे अशी संकटे येतात. त्याची आपण खबरदारी घ्यायला हवी. कागदाच्या बोटी सोडाव्या तशा गाड्या वाहून जात होत्या. पुन्हा त्याची पुनरावृत्ती होवू नये याची काळजी घ्यायला हवी. (Do development work considering flood line say Ajit Pawar pune)

ajit pawar
पुणे मेट्रोच्या पहिल्या 'ट्रायल रन'ला उपमुख्यमंत्र्याचा हिरवा कंदील, पाहा फोटो

मेट्रोच्या ट्रायल रनच्या उद्घाटनाला आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना विविध मुद्द्यावर भूमिका मांडल्या. कोकणात आलेल्या पुराचा संदर्भ घेत नद्या आणि समुद्राला भिंती घालण्याची चर्चा आहे, असे एका पत्रकाराने विचारले असता हे धांदात खोटे आहे. समुद्राला कोण भिंती घालणार अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतच्या चर्चेत तथ्य नसल्याचे सांगताना नदीपात्रात अतिक्रमणे होवू नये यासाठी कडक कारवाईची गरज आहे असे दादांनी ठणकावून सांगितले.

ajit pawar
संशोधन करा पण, विद्यापीठात राहू नका

कोरोना निर्बंधा बद्दल बोलताना पवार म्हणाले की, जीथे प्रमाण कमी आहे तेथेच निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. रविवारीच एक दिवस सुट्टी द्यावी असा विचार आहे. मुभा देत असताना नियमांचे पालन करुन करावे असा आदेश येईल. ग्रामीण भागात अजूनही मास्क वापरत नाही. तिथल्या प्रशासनाने यासंदर्भात कडक भूमिका घ्यायला पाहिजे. नागरिकांनीपण काळजी घ्यायला पाहिजे. आपल्यामुळे कोणाला त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी सर्वांनीच घ्यावी.वाहिन्यांनी सुध्दा ब्रेकिंग न्यूज सारखे या विषयाला सारखे दाखवावे म्हणजे त्याचा परिणाम होईल व कोरोनाचे प्रमाण कमी होईल.

ajit pawar
ताई, बघ मेट्रो आली...

पुणे करांविषयी बोलताना पवार म्हणाले की, विकास कामे करताना त्रासही होतो. पुणेकरांनी जी सहनशीलता संयम दाखवला त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. नागरीकांची मदत झाली म्हणूनच इथपर्यंतचा टप्पा गाठला. निवडणुका झाल्यावर विकासकामांना महत्व द्यायचे असते. त्यात राजकारण बाजूला ठेवायचे असते. मेट्रोचे काम निर्णायक टप्प्यावर आहे. ६० टक्के काम पुर्ण झाले आहे. यात मेट्रोच्या सर्व कर्मचा-यांची महत्वाची भूमिका आहे. संकटावर मात करुन पुढे जायचे असते. शहरात ज्या पध्दतीने वाहतुकीची कोंडी होते त्यावेळी मुळ पुणेकर आणि कामाव्यवसायाच्या निमित्ताने बाहेरुन आलेले जे नागरीक आहेत त्यांचा प्रवास सुखाचा व्हावा, प्रदूषण कमी व्हावे याचा विचार करुन या प्रकल्पाचे निर्माण केले.

सकाळी सहाला घ्यायचा का असे विचारले पण सातला घेतला. इतर पुणेकरांना त्रास होवू नये म्हणून सकाळी कार्यक्रम ठेवला. मागे काही कार्यक्रम झाले त्यामध्ये संयोजकांवर गुन्हे दाखल झाले. दिक्षितांवर गुन्हा दाखल होवू नये म्हणून काळजी घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com