

mpsc exam
esakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संयुक्त ‘गट ब’ परीक्षेत गैरप्रकार आढळल्यास दोषींवर कारवाई करा; परंतु समाजमाध्यमांवरील केवळ अफवा आणि संशयाच्या आधारे सरसकट परीक्षा रद्द करून प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय करू नका, अशी साद या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांनी राज्य सरकारला घातली आहे. पेपरफुटीच्या अफवा आणि ‘एसआयटी’ चौकशीच्या टांगत्या तलवारीमुळे नियुक्ती प्रक्रियेला अचानक खीळ बसल्याने, रात्रंदिवस एक करून यश मिळवणाऱ्या या विद्यार्थ्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे.