फास्टॅग स्कॅन न झाल्यास  टोलसाठी मोजू नका पैसे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

तुमच्या कारमध्ये फास्टॅग आहे; पण टोल नाक्‍यावर तो ‘स्कॅन’ झाला नाही तर, टोलसाठी पैसे देऊ नका. कारण तुमच्या टोलशी संलग्न बॅंक अकाउंटमध्ये ‘बॅलन्स’ असेल तर तुम्हाला मोफत सोडले जाणार असल्याचे स्पष्टीकरण टोल व्यवस्थापनाकडून करण्यात आले.  

पुणे - तुमच्या कारमध्ये फास्टॅग आहे; पण टोल नाक्‍यावर तो ‘स्कॅन’ झाला नाही तर, टोलसाठी पैसे देऊ नका. कारण तुमच्या टोलशी संलग्न बॅंक अकाउंटमध्ये ‘बॅलन्स’ असेल तर तुम्हाला मोफत सोडले जाणार असल्याचे स्पष्टीकरण टोल व्यवस्थापनाकडून करण्यात आले.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातून महामार्गांवरून प्रवेश करताना टोल नाक्‍यांवर फास्टॅग आता सक्तीचा झाला आहे. तो नसल्यास वाहनचालकांकडून दुप्पट टोल आकारला जात आहे. मात्र, कारला फास्टॅग लावला आहे; परंतु टोल नाक्‍यावर तो स्कॅन किंवा रिड झाला नाही तर, वाहनचालकांकडून टोलची रोख स्वरूपात रक्कम सध्या घेतली जात आहे; तसेच रोख रक्कम दिल्यावरही फास्टॅगची रक्कम अकाऊंटमधून वळती होत असल्याचा अनुभव काही वाहनचालकांना येत आहे. 

या पार्श्‍वभूमीवर पुणे-सातारा टोल नाक्‍याचे महाव्यवस्थापक अमित भाटिया म्हणाले, ‘‘फास्टॅग स्कॅन झाला नाही तर, ‘मॅन्युअल’ उपकरणावर तो स्कॅन केला जातो. परंतु, त्यावरही तो स्कॅन झाला नाही तर, मिस्ड कॉलमार्फत त्या वाहनचालकाच्या फास्टॅगशी संलग्न अकाउंटमध्ये बॅलन्स आहे का, हे तपासले जाते. बॅलन्स असेल तर त्या वाहनचालकाकडून टोलचे पैसे घेतले जात नाहीत.’’ 

केंद्र सरकारने काढलेल्या आदेशानुसार अंमलबजावणी सुरू आहे. सर्वंच नाक्‍यांवर ऑटोमॅटिक टोल स्कॅनर आणि मॅन्यूअल टोल स्कॅनर ठेवण्यास सांगण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. 

टोल नाक्‍यावरही विक्री
वाहनचालकांना फास्टॅग विकत घ्यायचा असल्यास टोल नाक्‍यांवरही तो उपलब्ध आहे. त्यासाठी आधार, पॅन कार्ड आवश्‍यक आहे. फास्टॅग विकत घेतल्यावर त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण केल्यावर २० मिनिटांत तो कार्यान्वित होतो. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशातील सर्वंच नाक्‍यांवर फास्टॅग विक्रीसाठी ठेवले आहेत, अशीही माहिती भाटिया यांनी दिली. सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर टोल नाक्‍यावर दररोज सुमारे ४०-५० फास्टॅगची विक्री होत असल्याचेही त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not count money for tolls if a fastag is not scanned

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: