esakal | स्ट्रेस कमी करायचाय? घरबसल्या करा ऑनलाईन योग ध्यानसाधना
sakal

बोलून बातमी शोधा

Do online yoga meditation at home to reduce stress

कोविड 19 चे संक्रमण रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान सहज योग ध्यानसाधनेचे ऑनलाईन सत्र गेल्या 21 दिवसांपासून सुरू आहेत. ट्रस्टच्या 'प्रतिष्ठान पुणे' या युट्यूब चॅनेल आणि 'इंडिया सहजयोगा या फेसबूक पेजवर दररोज दोन वेळा ध्यानसाधनेचे लाईव्ह सत्र घेतले जातात.

स्ट्रेस कमी करायचाय? घरबसल्या करा ऑनलाईन योग ध्यानसाधना

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : जगभरात वाढत असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीती आणि चिंता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मानसिक आणि शारीरिक ताण कमी करण्यासाठी समाज माध्यमातून 'मेडिटेशन'च्या सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन सत्राच्या या योग ध्यानसाधनेत सुमारे 50 देशातून दोन लाखाहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोविड 19 चे संक्रमण रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान सहज योग ध्यानसाधनेचे ऑनलाईन सत्र गेल्या 21 दिवसांपासून सुरू आहेत. ट्रस्टच्या 'प्रतिष्ठान पुणे' या युट्यूब चॅनेल आणि 'इंडिया सहजयोगा या फेसबूक पेजवर दररोज दोन वेळा ध्यानसाधनेचे लाईव्ह सत्र घेतले जातात. सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून, जगातील लोकांना एकत्रितपणे त्यांचे शारीरिक मानसिक आरोग्य तसेच तणाव व चिंता यांच्यापासून मुक्त ठेवण्यासाठी मेडिटेशन करणे खूप सहायक ठरेल. ट्रस्टच्या फेसबूक पेजवर सुमारे 61 हजार लोकांनी 16 हजार तासांहून अधिक काळ ध्यानाचे व्हिडीओ पाहिले आहेत. या उपक्रमात सहभाग झालेल्या स्वयंसेवकांमार्फत चालविण्यात येणाऱ्या विविध सत्रांमध्ये दररोज एक हजाराहून अधिक नवीन लोकं सहभाग नोंदवत आहेत. या समाज माध्यमांच्या साहाय्याने फक्त भारतातच नाही तर इतर देशांमध्ये असलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे, अशी माहिती ट्रस्टचे उपाध्यक्ष दिनेश राय यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ट्रस्टच्या वतीने, दररोज सकाळी सडेपाच आणि सात वाजता युट्यूब व इतर माध्यमांद्वारे ऑनलाईन 'मेडिटेशन' आयोजित केले जात आहे. तसेच सहज योग ध्यानधारणा शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी सायंकाळी साडेपाच वाजता विशेष सत्र आयोजित केले जाते. भारतातील टोल फ्री हेल्पलाईन 180030700800 या क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांना सहज योग संदर्भातील माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध केले जाते. यासाठी स्वयंसेवकांना नेमण्यात आले असून दररोज सुमारे 500 नागरिकांचे मार्गदर्शन केले जात असल्याचे राय यांनी सांगितले.

पुणेकरांनो, सावधान! कोरोनाच्या बळींचे झालंय शतक

loading image
go to top