esakal | 'असे काम करा की', पक्ष तुमच्याकडे पदे घेऊन येईल- खा. सुप्रिया सुळे
sakal

बोलून बातमी शोधा

supriya sule

'असे काम करा की', पक्ष तुमच्याकडे पदे घेऊन येईल- खा. सुप्रिया सुळे

sakal_logo
By
किरण भदे, नसरापूर

नसरापूर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज झालेल्या मेळाव्यात अऩेक कार्यकर्त्यांनी नेत्यांकडुन डावलले जात असल्याची भावना व्यक्त केल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलताना कार्यकर्त्यांनी पक्षाकडे उमेदवारी किंवा पदे मागण्याऐवजी, असे काम करा की पक्ष तुमच्याकडे पदे घेऊन येईल असा सल्ला दिला.

हेही वाचा: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन

आगामी निवडणुकाच्या पार्श्वभुमीवर भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अयोजीत करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, मानसिंग धुमाळ, उपसभापती लहुनाना शेलार, वंदना धुमाळ, चंद्रकांत बाठे, समिर धुमाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मेळाव्यात तालुक्यातील गट व गणामधील विविध कार्यकर्त्यांना मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली होती. यावेळी बोलताना सर्वच कार्यकर्त्यांनी तालुक्यातील नेते विश्वासात घेत नाहीत, वारंवार डावलले जाते असा नाराजीची सुर आळवला. युवा कार्यकर्त्यांना निवडीची पत्रे यावेळी देण्यात आली.

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले कि, कार्यकर्त्यांचे मन मोकळे झाले ते चांगले झाले यापुढे तालुक्यातील वरिष्ठांकडुन निश्चित सुधारणा केल्या जातील असे सांगुन आगामी निवडणुकात आघाडी होईल कि नाही माहीती नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पुर्णताकदीने निवडणुकीत उतरणार असुन सर्व कार्यकर्त्यांनी गाव वाडी वस्तीवर आपण केलेल्या कामाची माहीती पोहचवण्याचे काम सुरु करावे संघटनेच्या बरोबर अडचणीच्या काळात जे थांबले त्यांना योग्य न्याय दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिली.

जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी बोलताना कार्यकर्त्यंनी नकारात्मक मानसिकता बदलावी असे सांगुन पक्षाशी प्रामाणिक राहीले नाहीतर काय होते याचे उत्तर आजच आले आहे भोर पंचायत समिती निवडणुकीत पक्षादेश डावलणारया तीन सदस्यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी यांनी रद्द केले असुन पक्षाने या आगोदरच त्यांना पक्षातुन काढले आहे या पुढे गट तट थांबवा अन्यथा कितीही मोठा नेता असला तरी पक्षाकडुन कारवाई होईल असा इशारा त्यांनी दिला.

रणजित शिवतरे यांनी पक्षाच्या माध्यमातुन भोर तालुक्यात झालेल्या कामांची माहीती देऊन रिंगरोड, पीएमआरडीए बाबतच्या अडचणीत पक्ष शेतकरयांच्या ग्रामस्थांच्या पाठिशी असल्याचे सांगितले. भालचंद्र जगताप यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातुन तालुक्यातील युवकांना दिलेल्या रोजगाराची तसेच शेतकयांच्या कामांची माहिती दिली. चंद्रकांत बाठे, मानसिंग धुमाळ, वंदना धुमाळ, लहुनाना शेलार, यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश खुटवड यांनी तर अभार स्वप्निल कोंडे मानले.

loading image
go to top