

Aurangzeb changed Pune to Muhiyabad during Mughal campaigns against Marathas, highlighting historical strategies and city transformations
esakal
Maharashtra Historical News : सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला संपवण्यासाठी मुघल बादशाह औरंगजेब महाराष्ट्रात दाखल झाला. १७०३ च्या सुमारास जेव्हा औरंगजेब पुण्यात आला, तेव्हा या शहराचे मोक्याचे स्थान पाहून तो प्रभावित झाला. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रावर आणि मराठ्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी पुणे हे अतिशय सोयीचे केंद्र होते. याच रणनीतीचा भाग म्हणून त्याने पुण्यात आपली लष्करी छावणी स्थापन केली. मराठ्यांच्या किल्ल्यांना वर्षोनुवर्षे वेढा घालूनही यश मिळत नव्हते आणि एखादा किल्ला जिंकलाच, तरी मराठे तो गनिमी काव्याने पुन्हा हस्तगत करत असत. या सततच्या संघर्षाने औरंगजेब हरल्यासारखे फील करत होता.