ओ डॉक्टर, उपचार करताय की लुटताय? पाठदुखीच्या उपचारावेळी महिलेकडून उकळले 20 लाख!

Doctor
Doctor

पुणे : पाठदुखीवर उपचार करण्याचा बहाणा करून एका बोगस डॉक्‍टरने वृद्ध महिलेची 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 65 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरून दोघांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लष्कर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एम.व्ही.राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या जयपूर येथील उच्च न्यायालयातून लिपिक या पदावरून निवृत्त झालेल्या आहेत. लष्कर परिसरामध्ये त्या त्यांच्या बहिणींसमवेत राहतात. 12 डिसेंबरला दुपारी साडेबारा वाजता त्या लष्कर परिसरातील ईस्ट स्ट्रीट परिसरातून घरी जात होत्या. त्यांना पाठदुखीचा त्रास असल्याने त्या वाकून चालत होत्या. फिर्यादी कयानी बेकरीसमोर आल्या.त्यावेळी त्यांच्या पाठीमागे एक तरुण आला. त्याने फिर्यादीशी संवाद साधत, त्यांना तुमची पाठ दुखतेय का अशी विचारणा केली. तेव्हा, फिर्यादीने त्यांना पाठदुखीचा त्रास असल्याचे त्यास सांगितले.

तेव्हा संबंधित तरुणाने फिर्यादी माझ्या आईलाही पाठदुखीचा त्रास होता. एका डॉक्‍टरकडे तिच्यावर उपचार केल्यानंतर आता ती पूर्णपणे बरी झाली, असल्याची बतावणी केली. तेवढ्यावरच न थांबता त्याने मोबाईलवरून एका महिलेस फोन लावून फिर्यादी बोलण्यास सांगितले. तेव्हा, फोनवरील महिलेने आपल्यालाही पाठदुखीचा त्रास होता, मात्र एका डॉक्‍टरकडे उपचार घेतल्यानंतर आपण पूर्ण बरे झाल्याची बतावणी केली. त्यावर फिर्यादी महिलेने विश्‍वास ठेवला. 

दरम्यान, आरोपीने दोन दिवसांनी फिर्यादीच्या मोबाईलवर काही दिवसांनी संपर्क केला. पाठदुखीवर उपचार करणारे डॉक्‍टर पुण्यात आले आहेत, असे सांगून फिर्यादी संबंधित डॉक्‍टरकडे घेऊन गेला. त्या डॉक्‍टरने महिलेस पाठदुखीवरील उपचारासाठी 20 लाख रुपये इतका खर्च आल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेने तिच्या मुदतठेवीतील 10 लाख रुपये व बहिणीच्या मुदतठेवीतील 10 लाख रुपये असे एकूण 20 लाख रुपये संबंधित डॉक्‍टरला दिले. त्यानंतर फिर्यादीने आरोपीच्या मोबाईलवर संपर्क साधला, मात्र फोन लागला नाही. त्यावेळी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com