Pune News : हा काय आश्रम आहे का'? असे म्हणत डॉक्टरने रुग्णाला हाकलले; घरी गेल्‍यावर रुग्णाचा तिसऱ्या दिवशी मृत्यू

Doctor Denies Treatment Patient Dies: मला चालताही येत नव्‍हते. माझे पाय सूजलेले आहेत. घरी मी एकटा राहतो. काळजी घेणारे कोणी नाही.
Pune News
patient girish moresakal
Updated on

पुणे - ‘सकाळी माझी शुगर ३१ इतकी खाली आली होती. त्‍यामुळे मला चालताही येत नव्‍हते. माझे पाय सूजलेले आहेत. घरी मी एकटा राहतो. काळजी घेणारे कोणी नाही. मला आणखी काही दिवस येथे उपचारासाठी राहूद्या’ अशा शब्‍दात आर्जव करणाऱ्या रुग्‍ण व नातेवाइकांचा औंध जिल्‍हा रुग्‍णालयातील डॉक्‍टरला पाझर तर फुटला नाही.

उलट तू बरा झाला आहेस ‘हा काय आश्रम आहे का?’ असा अपमानित करणारा शब्‍दप्रयोग करत त्‍याला रुग्‍णालयातून सुटी (डिस्‍चार्ज) घ्यायला लावली. अखेर त्‍या रुग्‍णाचा तिसऱ्या दिवशी (१२ जानेवारी) घरी अंत झाला. गिरीश मोरे (वय-44, रा. येरवडा) असे या मृत्‍यू झालेल्‍या रुग्‍णाचे नाव आहे.

रुग्‍णाला मरणाच्‍या दाढेतून बाहेर काढणाऱ्या डॉक्‍टरांची तुलना देव माणसासोबत केली जाते. परंतु, जिल्‍हा रुग्‍णालयातील उपचार करणारे डॉक्‍टर खरेच त्‍या बिरूदावलीला जागतात का? असा प्रश्‍न या निमित्‍ताने नातेवाइकांनी उपस्थित केला आहे. हा प्रकार सुमारे सव्‍वा दोन महिन्‍यापूर्वी १० जानेवारीला घडला असून यामध्‍ये नातेवाइकांनी रुग्‍ण व डॉक्‍टरांसोबतचा संवाद रेकॉर्ड केला आहे.

Pune News
Lohgaon Accident : डंपरच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

शुगरचा त्रास झाल्‍याने मोरे यांना जिल्‍हा रुग्‍णालयात ३ जानेवारीला पुरूषांच्‍या मेडिसिन या कक्षात उपचारासाठी दाखल केले होते. त्‍यांच्‍यावर फिजिशियन डॉ. अमोल बोंद्रे हे उपचार करत होते. त्‍यांनी रुग्‍णाचे ‘जुनाट व्‍यसनाधीनता व मधुमेह’ (क्रॉनिक अल्‍कोहोल ॲंड टाइप २ डायबेटिस) असे निदान केले. उपचारानंतर मोरे यांची शुगर नियंत्रणात आली.

परंतु, १० जानेवारीला ती नियोजित प्रमाणापेक्षा खूपच कमी म्‍हणजे ३१ झाली. पायांवरही सूज होती. त्‍यामुळे त्‍यांना चालताही येत नव्‍हते. दुसरीकडे त्‍यांना डॉ. बोंद्रे हे त्‍यांना काही समस्‍या नसल्‍याचे सांगत सुटी घेण्‍याचा आग्रह करत असल्‍याचे दिसून येते. त्‍यावर रुग्‍ण व नातेवाईकही त्‍यांना बरे वाटत नसून आणखी काही दिवस राहूद्या अशी विनंती करत असल्‍याचे व्हिडीओमध्‍ये दिसून येत आहे.

रुग्‍णाची पत्‍नी व मुले सोबत राहत नसल्‍याने तो घरी एकटाच राहत होता. त्‍यांच्‍या पायाला सूज असताना व शुगर नियंत्रणात आली नसताना त्‍याला १० जानेवारीला डॉक्‍टरांनी घरी सोडले. त्‍यावेळी रुग्णालयात इतर फारसे रुग्णही नव्हते, तरीही घरी सोडले. परंतु, १२ जानेवारीला सकाळी ते मृत अवस्‍थेत आढळले. जर त्‍यांना आणखी काही दिवस उपचार मिळाले असते तर ते नक्‍कीच जगले असते.

- रुग्‍णाचे नातेवाईक

हा रुग्‍ण क्रॉनिक अल्‍कोहोलिक होता. उपचारानंतर त्‍याची शुगर नियंत्रणात आल्‍याने डॉक्‍टरांनी त्‍याला घरी सोडले होते. याबाबत अधिक चौकशी करण्‍यात येईल.

- डॉ. नागनाथ यमपल्‍ले, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक, जिल्‍हा रुग्‍णालय औंध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com