This incident in Pune has raised serious concerns about safety within the medical sector.
Sakal
पुणे : परिचारिकेच्या हातावर जखम झाल्यानंतर उपचार करण्याच्या बहाण्याने अश्लील वर्तन करणाऱ्या एका ४८ वर्षीय डॉक्टरविरुद्ध आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी परिचारिका असून, ती जांभूळवाडी रस्त्यावरील एका दवाखान्यात काम करते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. २९) सकाळी ती नेहमीप्रमाणे दवाखान्यात कामास गेली.