धक्कादायक! कोरोनाचे कारण देत बलात्कार पीडितेच्या तपासणीस डॉक्टरांनी दिला नकार

डॉ. संदेश शहा
Sunday, 28 June 2020

एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करण्यात आले होते. या मुलीवर वेळोवेळी बलात्कार झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याने पोलिसांनी पीडितेस वैद्यकीय तपासणीसाठी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. मात्र कोरोनाचे कारण पुढे करत उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. शिरीष साळुंखे यांनी वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिला.

इंदापूर : कोरोनाचे कारण पुढे करत अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या तपासणीस नकार देणाऱ्या इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यास उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून संबंधीताने यासंदर्भात दोन दिवसात उत्तर द्यायचे आहे. दरम्यान, पीडित मुलीची तपासणी बारामती शासकीय रुग्णालयात करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गणेश लोकूर यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करण्यात आले होते. या मुलीवर वेळोवेळी बलात्कार झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याने पोलिसांनी पीडितेस वैद्यकीय तपासणीसाठी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. मात्र कोरोनाचे कारण पुढे करत उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. शिरीष साळुंखे यांनी वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिला. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक गणेश लोकरे यांनी संबंधित डॉक्टरची आरोग्य विभागाकडे तक्रार केली. त्याची दाखल घेत डॉ.साळुंखे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. 

जिजा आणि दाजी; वाचा शरद पवार यांच्या लग्नाची गोष्ट!

इंदापूर येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस गावातील २३ वर्षीय मुलाने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. आरोपीस सोमवार २२ जूनला पोलिसांनी अटक करून पीडित मुलीची त्यांच्या ताब्यातून सुटका केली. बाल लैंगिक अत्याचार कायद्दान्वये आरोपीवर पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आल्या नंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीस पोलिसांनी इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी 24 जूनला दाखल केले मात्र रुग्णालयातील डॉ. साळुंखे यांनी बलात्कार पीडित मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यास कोरोनाचे कारण सांगून तसेच रुग्णालयात महिला डॉक्टर नसल्याचे कारण पुढे करून नकार दिला. त्यामुळे प्रकरण संवेदनशील बनले. 

पुण्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतीच, आता तुम्हीच तुमचे रक्षक व्हा!

यासंदर्भात डॉ.साळुंखे म्हणाले, ''उपजिल्हा रुग्णालयात 17 जूनला प्रसूतीसाठी महिला आली होती. तिला प्रसूतीसाठी पुण्यास पाठवण्यात आल्यानंतर तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे माझे 14 दिवस विलगीकरण करण्यात आले होते. मला प्रसूती तसेच इतर शस्त्रक्रियामध्ये भाग घेऊ नका असे तोंडी आदेश देण्यात आले होते. त्यामुळे आपण पीडित मुलीची तपासणी करण्यास नकार दिला असा खुलासा करत वस्तुतिथी न पाहता आपली निष्कारण मानहानी करण्यात आल्याचा डॉ. साळुंखे यानी दावा केला. ''

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होणार...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors refused to examine the girl victim citing Corona reason In Indapur