

Healthcare services across Maharashtra will continue normally on Monday, providing major relief to patients following the IMA's decision.
Sakal
पुणे : डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पुकारलेला सोमवारचा (ता. २०) राज्यव्यापी लाक्षणिक संप इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) स्थगित केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत केलेल्या आवाहनानंतर आणि आरोपीचा जामीन स्थगित केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सोमवारी राज्यातील आरोग्य सेवा पूर्ववत सुरू राहणार असून रुग्णांना दिलासा मिळाला आहे.