पुण्यातील नगरसेवकांचे अजित पवारांना बळ?

ज्ञानेश सावंत
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

राज्यात सत्ता स्थापनेबाबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यात जवळपास एकमत झाले असून, सत्ता स्थापनेचा मुहूर्त जाहीर होण्याची शक्‍यता असतानाच शनिवारी भल्या सकाळी अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर, अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या या भूमिकेने अवघ्या महाराष्ट्राचे राजकीय क्षेत्र पुरते हादरले. तेव्हा, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे शहर, जिल्हा आणि राष्ट्रवादीत संभ्रम निर्माण झाला.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडाचे निशाण फडकावताच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गोंधळात पडले आहे. दुसरीकडे, महापालिकेत 42 पैकी निम्मे नगरसेवक हे 'दादां'च्या भूमिकेकडे डोळे लावून बसले आहेत तर, काही ज्येष्ठ नगरसेवक पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत अर्थात 'साहेबां'सोबत असल्याचे सांगत आहे. परंतु, उघडपणे बोलण्यास नगरसेवकांचा 'ना' आहे. 

ज्या बातम्यांसाठी सकाळचे एप डाऊनलोड करा  

राज्यात सत्ता स्थापनेबाबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यात जवळपास एकमत झाले असून, सत्ता स्थापनेचा मुहूर्त जाहीर होण्याची शक्‍यता असतानाच शनिवारी भल्या सकाळी अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर, अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या या भूमिकेने अवघ्या महाराष्ट्राचे राजकीय क्षेत्र पुरते हादरले. तेव्हा, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे शहर, जिल्हा आणि राष्ट्रवादीत संभ्रम निर्माण झाला. त्याचवेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांनी बंड केल्याचेच जाहीर केले. त्यामुळे पदाधिकारी-कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत. 

आणखी वाचा : पवार कुटुंबात कोण काय करतंय? 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौरपदाच्या निवडीवरून भाजपविरोधात आघाडी करताना राष्ट्रवादीने शिवसेनेला सोबत घेतले. त्यामुळे नव्या राजकीय समीकरणांचे अंदाजे बांधले जात असताना दादा मात्र भाजपच्या तंबुत गेल्याने पुणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नगरसेवकांना धक्का बसला. विद्यमान 42 पैकी जवळपास निम्मे नगरसेवक दादांशी बोलून भूमिका घेऊ, असे सांगत आहेत. 

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: does corporator in pune support Ajit Pawar?