coronavirus: संचारबंदी शिथील करताच सोशल डिस्टन्सिंगचे "तीनतेरा' 

bhosari
bhosari
Updated on

भोसरी - पोलिस आणि नागरिकांच्या सहकार्याने येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली कडक संचारबंदी यशस्वी झाली. मात्र, सोमवारी (ता. 13) ही संचारबंदी काहीशी शिथील करण्यात आल्यानंतर परिसरातील किराणा मालाच्या दुकानात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली. तसेच सोशल डिस्टन्सिंचे "तीनतेरा' वाजले. 

भोसरीत शुक्रवारपासून (ता. 10) रविवारपर्यंत (ता. 12) कडक संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यात औषधांच्या दुकानाव्यतिरिक्त काहीही सुरू नव्हते. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत संचारबंदी यशस्वी केली. त्याला नागरिकांनीही चांगले सहकार्य केले. मात्र, सोमवारी संचारबंदीत काहीशी शिथिलता दिली. त्यामुळे किराणामाल घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. सोशल डिस्टंसिंगचा पाळले गेले नाही. पोलिसांनी मात्र भोसरीतील पीएमटी चौक आणि पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील फळे विक्रेत्यांना हुसकावून लावले. त्याचप्रमाणे चौकाचौकात पोलिस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Inauguration of the 38th Pune Festival by Vice President C.P. Radhakrishnan
Kasba Ganpati Installed in Houston, Texas for Golden Jubilee
Attempt to Murder Using Tractor in Malegaon Shivnagar
Opposition to Mess Price Hike and Demand for University Subsidy
Marathi News Esakal
www.esakal.com