मांजरी - मॉर्निंग वॉक करताना कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या निवृत्त शिक्षकाला श्वानदशांवरील लस घेण्यासाठी मोठी फरपट सहन करावी लागली. ही लस मिळवण्यासाठी त्यांना शहरातील चक्क तीन दवाखाने फिरावे लागले. आरोग्य प्रशासनाच्या अशा गलथान कारभाराविषयी या ज्येष्ठ निवृत्त शिक्षकाने तीव्र संताप व्यक्त केला आहे.