Pune Airport : धावपट्टीवर कुत्रा विमानाच्या घिरट्या; वैमानिकाने सुमारे १५० फूट उंचीवर असताना लँडिंग थांबवले
Pune News : भुवनेश्वरहून पुण्याला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग कुत्र्यामुळे थांबवावे लागले. वैमानिकाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी योग्य निर्णय घेतला.
पुणे : भुवनेश्वरहून पुण्याला येणारे एअर इंडियाचे विमान (आयएक्स १०९७) हे पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्याच्या प्रक्रियेत होते. विमान सुमारे १०० ते १५० फूट उंचीवर असतानाच वैमानिकाला धावपट्टीवर कुत्रा आढळून आला.