Dog Vaccination: श्वानांच्या लसीकरणात अडथळे; श्वानप्रेमी, संस्थांकडून विरोध, महापालिकेची दमछाक
Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या श्वानांच्या लसीकरण आणि निर्बीजीकरण शस्त्रक्रियेला काही श्वानप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांकडून विरोध होत असल्याने कारवाईवर अडथळा येत आहे. केंद्र सरकारच्या २०३० पर्यंत ‘पुणे शहर रेबीजमुक्त’ करण्याच्या उद्देशाला या अडथळ्यामुळे आव्हान निर्माण झाले आहे.
पुणे : शहरात श्वानदंशाच्या घटना वाढत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी आणि २०३० पर्यंत पुणे शहर रेबीजमुक्त करण्यासाठी महापालिकेने भटक्या श्वानांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया आणि लसीकरणावर भर दिला आहे.