पुणे - चित्रपटाचा सर्वोत्तम दृकश्राव्य अनुभव देणाऱ्या ‘डॉल्बी सिनेमा’ या तंत्रज्ञानाचा आविष्कार आता पुण्यात अनुभवता येणार आहे. खराडी येथील ‘सिटी प्राइड’मध्ये ‘डॉल्बी सिनेमा’ असणारे एक चित्रपटगृह सुरू झाले असून या तंत्रज्ञानाचा अनुभव देणारे हे संपूर्ण भारतातील पहिलेच चित्रपटगृह ठरले आहे.