- तुळशीराम घुसाळकरलोणी काळभोर - घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांकडून पतीवर कटरने जीवघेणा हल्ला केला असल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पत्नी, सासू, मावस सासू व मेव्हण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत योगेश रामचंद्र काळभोर (वय ३६, रा. साठे वस्ती, रामदरा रोड, लोणी काळभोर) हे जखमी झाले असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पत्नी निलम, सासू अनिता शिंदे, मावस सासू ललिता चौरे आणि मेव्हणा लकी चौरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..मिळालेल्या माहितीनुसार, ३ एप्रिल रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास योगेश व निलम यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचा राग मनात धरून तिने आपल्या माहेरच्या नातेवाईकांना घरी बोलावून घेतले. काही वेळाने त्याची सासू, मावस सासू व मेव्हणा हे तेथे पोहोचले. लकी चौरे याने शिवीगाळ कमरेला असलेल्या चावीच्या किचनमधून छोटा कटर काढून त्यांच्या चेहऱ्यावर वार केला. या हल्ल्यात योगेश यांच्या चेहऱ्यावर गंभीर जखम झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला..तर सासू, मावस सासू आणि पत्नी यांनीही मिळून योगेश यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. यांत मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या पुतण्यालाही मारहाण करण्यात आली आहे. जखमी योगेशला नातेवाईकांनी तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यांवरून लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.