एमपीएससी परीक्षेत वाढतोय इंजिनीअर्सचा दबदबा; पदवीधारकांना जातोय 'सीसॅट'चा पेपर अवघड

The dominance of engineers in the MPSC Exam is increasing
The dominance of engineers in the MPSC Exam is increasing
Updated on

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्य सेवा पूर्व परीक्षेत सर्वाधिक गुण घेऊन टाॅप करण्यात इंजिनिअरींचे विद्यार्थी पुढे आहेत. संपूर्ण निकालात २० टक्के इंजिनिअर अधिकारी झाले आहेत. प्रत्येक परीक्षेत हे प्रमाण वाढत आहेत. मात्र, पारंपरिक पदवीधर विद्यार्थ्यांना परीक्षेत 'सीसॅट'चा पेपर अवघड जात असल्याने टाॅप करण्यात अडचणी आहेत, पण निकालात ७० टक्के अधिकारी हे पारंपरिक पदवीधर आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

'एमपीएससी'चा २०१९ राज्य सेवा परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. ४२० जणांच्या निवड यादीत राज्यात प्रथम क्रमांक पटकविणारे प्रसाद चौगुले, महिलांमध्ये प्रथम येणार्या पर्वणी पाटील हे दोघे इंजिनीयर आहेत. तर, मागासवर्गीय गटातून प्रथम तर राज्यात दुसरे येणारे येणारे रविंद्र शेळके हा डाॅक्टर आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये इंजिनिअरींगचा दबदबा वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

पुणे : पतीने गळफास घेतलेला पाहून पत्नीनेही...

इंजिनीअर म्हटले की, पदवी प्राप्त केल्यानंतर मोठ्या कंपनीत चांगल्या पॅकेजची नोकरी स्वीकारायची, परदेशात जाण्यासाठी प्रयत्न करायचे असा प्रयत्न असतो, मात्र गेल्या काही वर्षांपासून इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडेही लक्ष वळविले आहे.

विद्यार्थ्यांनो, 'या' तारखेपर्यंत भरा परीक्षेचा अर्ज; पुणे विद्यापीठाने पुन्हा एकदा दिली मुदतवाढ

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक नवनाथ गव्हाणे म्हणाले, "राज्य सेवा पूर्व परीक्षेत पुर्वीपासून बीए, बीएससी, बीकाॅम केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रभाव आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यामध्ये ७० टक्के विद्यार्थी पारंपरिक पदवीधर आहेत. २० टक्के विद्यार्थी हे इंजिनीअरिंगचे आहेत. तर १० टक्के मध्ये डाॅक्टर, वकिल यासह इतर शाखांचे पदवीधर आहेत. 

- लॉकडाऊन शिथील होताच आत्महत्यांच्या घटना वाढल्या; काय आहेत याची कारणे?

मार्गदर्शक डाॅ. सुशील बारी म्हणाले, "राज्य सेवेची पूर्व परीक्षेत दोन पेपर पैकी गणित, बुद्धीमत्ता यासाठी 'सीसॅट'चा पेपर असतो तर दुसर्या 'जीएस'च्या पेपरमध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र यावर प्रश्न असतात. या दोन पेपरमधील गुणां वरून गुणवत्ता यादी काढताना 'सीसॅट'मध्ये इंजिनिअरींगचे विद्यार्थी चांगले गुण घेऊन पूर्व परीक्षा पास होत आहेत. त्यामुळे अंतीम निकालात ही त्यांची वरचष्मा आहे. तर पारंपरिक पदवीधर मागे पडत असल्याने यूपीएससी प्रमाणे एमपीएससीनेही सीसॅटच्या गुणांचा गुणवत्तायादीसाठी विचार करू नये अशी मागणी विद्यार्थी करत आहेत, पण ती मंजूर झालेली नाही, असेही बारी यांनी सांगितले. 

आत्महत्या का घडतात? काय आहेत करणे वाचा सविस्तर

सीसॅटमळे स्पर्धा परीक्षेला पसंती
महाराष्ट्रात इंजिनिअरींग काॅलेजची संख्या भरमसाठ वाढली आहे. त्यात उत्तमप्रकारे शिक्षण मिळतेच असे नाही, इंजिनिअरींग होण्याचे प्रमाण वाढले असल्याने चांगल्या पगाराची नोकरी मिळत नसल्याने गेल्या ४-५ वर्षांपासून स्पर्धा परीक्षा देण्याकडे या विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. व्यावसायिक शिक्षण घेतल्याने त्यांना ही परीक्षा देणे तुलनेने सोपे जाते," असे बारी यांनी सांगितले. 

- 'अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय...'; सरकारच्या निर्णयाबाबत विद्यार्थ्यांचं म्हणणं काय?

"इंजिनिअरींगचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, त्यांना आवश्यक असलेले शिक्षण मिळावे यासाठी पुणे विद्यापीठानेही अभ्यासक्रम बदलला तरी स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक गोष्टी कायम ठेवल्या आहेत" 
- डॉ. मनोहर चासकर, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान

पोटातच बाळ मरण पावलेल्या महिलेसाठी अँब्यूलन्स चालक ठरला देवदूत  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com