'दोन भारतरत्न' कार्यक्रमात निनादले भावपूर्ण स्वर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Don Bharat Ratna song program pune

'दोन भारतरत्न' कार्यक्रमात निनादले भावपूर्ण स्वर

पुणे : बाजे रे मुरलीया... इंद्रायणी काठी... विठ्ठलाच्या पायी... अशी भक्तिमय भजने, तसेच भय इथले संपत नाही... सुनो सजना... नाम गुम जायेगा... लग जा गले... आदी अजरामर गाण्यांतून निनादलेल्या भावपूर्ण स्वरांनी शनिवारी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहातील वातावरण भारावून गेले.

निमित्त होते, मनीषा निश्चल्स 'महक' निर्मित, गेट सेट गो प्रस्तुत आणि आदिमा कॉन्सर्ट्स अँड इव्हेंट्स आयोजित 'दोन भारतरत्न' या कार्यक्रमाचे. पं. भीमसेन जोशी आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना या कार्यक्रमातून स्वरांजली अर्पण करण्यात आली. ज्येष्ठ निवेदक आनंद देशमुख यांचे ओघवते निवेदन व आठवणी, चैतन्य कुलकर्णी आणि मनीषा निश्चल यांचे मंत्रमुग्ध करणारे गायन आणि प्रसन्न बाम, यश भंडारे, अपूर्व द्रविड, निलेश देशपांडे, विशाल गंड्रतवार, उद्धव कुंभार या वाद्यवृंदाची साथसंगत यामुळे श्रोत्यांना स्वरानुभूती घेता आली.

रम्य ही स्वर्गाहून... राम का गुणगान... रहे ना रहे हम... पिया तोसे... सखी मंद झाल्या... सूर येती विरून जाती... अशा अवीट चालीच्या गाण्याचे यावेळी सादरीकरण झाले. याप्रसंगी आबा बागुल, माधवी वैद्य, महेश सुर्यवंशी, किशोर सरपोतदार, ऋषिकेश सोमण, आनंद सराफ, संजीव वेलणकर यांच्यासह गेट सेट गोचे अमित कुलकर्णी, 'आदिमा'चे रवींद्र देशपांडे आदी उपस्थित होते.

Web Title: Don Bharat Ratna Song Program Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top