एक एकर जमिनीला १८ कोटी रुपये देणे व्यवहार्य नाही - अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

एक एकर जमिनीला १८ कोटी रुपये देणे व्यवहार्य नाही - अजित पवार

पुणे: आता पुण्यात वेगवेगळी कामं सुरु आहेत. कामं वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे.लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कंत्राटदारांना दिला. ते पुण्यात सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलत होते. केंद्र, राज्य आणि मनपा तिघांनी समन्वय ठेऊन काम वेळेत पूर्ण केली पाहिजेत असे अजित पवार म्हणाले. "गडकरी साहेबांच्या कामाचा स्पीड आपल्याला माहित आहे. इथल्या नागरिकांना कमीत कमी त्रास कसा होईल. वेळेत काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार, महापालिकेने लक्ष द्यावं. राज्य सरकाची गरज असेल, काही अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी मी तयार आहे" असे अजित पवार म्हणाले.

"काल मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, गडकरींसोबत दोन कार्यक्रम आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी गडकरींची सोयीची वेळ बघा आणि राज्यातील प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सह्याद्रीवर बैठक आयोजित करण्यास सांगितली" असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा: 'नवी मेट्रो शोधलीय, चंद्रकांत दादा तुम्ही साडेतीन तासात कोल्हापूरला जाल'

"काम गतीने, विकस गतीने झाला पाहिजे. याबत दुमत असण्याचं कारण नाही. मधल्या काळात राज्य सरकारकडून जमिनीच्या बदल्यात मोबदला देण्याचा निर्णय झाले होता. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत मोबदला देण्याचे प्रमाण जास्त होते. आता दर बदलायचे आहेत" असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा: आदित्य चोप्राने धुडकावली अ‍ॅमेझॉन प्राइमची ४०० कोटींची ऑफर

"काही ठिकाणी एक एकर जमिनीसाठी १८ कोटी रुपये दिल्याची उदहारणे समोर आली. एक एकर जमिनीला १८ कोटी रुपये देणे व्यवहार्य ठरत नाही. एककाळ असा होता की, पैसे कमी मिळत असल्याने लोक वैतागले होते. आता लोक भेटतात तेव्हा रस्ता रानातून नेण्याची विनंती करता हा पूर्ण विरोधाभास आहे" याकडे अजित पवारांनी लक्ष वेधले.

loading image
go to top