आदित्य चोप्राने धुडकावली अ‍ॅमेझॉन प्राइमची ४०० कोटींची ऑफर

लॉकडाउनमध्ये अनेक चित्रपट निर्मात्यांनी आणि प्रॉडक्शन हाऊसने ओटीटीचा पर्याय निवडला.
aditya chopra
aditya chopra

निर्माता आदित्य चोप्रा Aditya Chopra प्रकाशझोतापासून दूर काम करणं पसंत करतो. यशराज फिल्म्सची YRF सुत्रे आदित्यच्या हाती असून सध्या अनेक बिग बजेट चित्रपटांवर तो काम करत आहे. २०१९ आणि २०२० च्या सुरुवातीस घोषित झालेले हे चित्रपट अजूनही प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. 'पिंकविला'च्या रिपोर्टनुसार, आदित्य चोप्राला अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओने Amazon Prime Video चार मोठे चित्रपट विकत घेण्याची ऑफर दिली आहे. बंटी और बबली २, शमशेरा, पृथ्वीराज आणि रणवीर सिंगचा जयेशभाई जोरदार या चार चित्रपटांचा त्यात समावेश आहे.

लॉकडाउनमध्ये अनेक चित्रपट निर्मात्यांनी आणि प्रॉडक्शन हाऊसने ओटीटीचा पर्याय निवडला. मात्र आदित्य चोप्राने तब्बल ४०० कोटींची ऑफर धुडकावल्याची माहिती समोर येत आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने आदित्यला हे चार चित्रपट विकत घेण्यासाठी ४०० कोटी रुपयांची ऑफर दिली होती. मात्र त्याने त्यास साफ नकार दिला. "यशराज फिल्म्सचे सर्व चित्रपट हे सिनेमाहॉल्समध्ये प्रदर्शित होण्यासारखे आहेत. प्रदर्शनाची तारीख कधीही जाहीर केली जाऊ शकते", असं कारण त्यांच्याकडून देण्यात आलं.

aditya chopra
समंथासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर नाग चैतन्यची पहिली प्रतिक्रिया
aditya chopra
Indian Idol 12: सायली कांबळे 'या' व्यक्तीला करतेय डेट

"आदित्य चोप्राला सहकार्य करण्यास आणि त्याच्यासोबत थेट डिजिटल व्यवहार करण्यास अनेक मोठे व्यावसायिक उत्सुक आहेत. मात्र यशराज फिल्म्सचे चित्रपट मोठ्या पडद्यावरच प्रदर्शित होतील, असं सांगून आदित्यने वारंवार ऑफर्स नाकारल्या आहेत", अशी माहिती 'बॉलिवूड हंगाामा'ने दिली. यशराजकडून जवळपास १५ महिन्यांआधी या चित्रपटांची घोषणा झाली. त्यापैकी काहींचं चित्रीकरण पूर्ण झालं असून हे चित्रपट केवळ प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. आदित्यने नकार दिल्यानंतर अॅमेझॉन प्राइमने दोन छोट्या चित्रपटांची ऑफर दिली. बंटी और बबली २ आणि जयेशभाई जोरदार हे दोन चित्रपट तरी विकत घ्यावे, अशी विनंती त्यांनी आदित्यकडे केली. मात्र ही ऑफरसुद्धा त्याने नाकारली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com