महत्वाची बातमी : घरेलू कामगारांना सोसायटीची दारे खुली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

या सोसायट्यांनी दिला प्रवेश...
बिबवेवाडीतील गंगाधाम फेज १, फेज २, लेकटाउन आदी प्रमुख सोसायट्यांचाही त्यात समावेश आहे. तर सिंहगड रस्त्यावरील ज्ञानगंगा सुविधा सोसायटीने फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी घरेलू कामगारांना परवानगी दिली आहे. बिबवेवाडीतील रम्यनगरी सोसायटीनेही सुमारे २०० घरेलू कामगारांना परवानगी दिली आहे, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत दिवेकर यांनी दिली. करिष्मा सोसायटीने २०० तर हिमाली सोसायटीने ४० घरेलू कामगारांना प्रवेश दिला आहे. स्वप्नशिल्प सोसायटीने ३६४ घरेलू कामगारांना सोसायटीची दारे खुली केली आहेत.

स्वप्नशिल्पचे सचिव प्रशांत भोलागीर म्हणतात...

  • सोसायटीत प्रवेशापूर्वी कामगार हात-पाय धुतात
  • त्यानंतर त्यांची थर्मोमीटरद्वारे तपासणी केली जाते
  • सॅनिटायझरद्वारे हात धुतल्यानंतर कामगारांना आतमध्ये प्रवेश
  • गुटखा, तंबाखू खाणाऱ्यांना प्रवेश बंद
  • चेहऱ्यावर मास्क नसल्यास प्रवेश नाही

पुणे - कोथरूडमधील मोठ्या समजल्या जाणाऱ्या स्वप्नशिल्प, हिमाली आणि करिष्मा सोसायटीने घरेलू कामगारांना पुरेशी खबरदारी घेऊन त्यांची प्रवेशद्वारे खुली केली आहेत. त्यामुळे किमान तीन सोसायट्यांमधूनच ६५० हून अधिक घरेलू कामगारांना पुन्हा रोजगार मिळाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या लॉकडाउनमुळे शहर आणि परिसरातील सुमारे दोन लाख घरेलू कामगार अडचणीत आले आहेत. या असंघटित कामगारांमध्ये प्रामुख्याने घरेलू कामगारांचा समावेश आहे. तसेच चालक, गाड्या धुणारे, बागकाम करणाऱ्यांचाही त्यात समावेश आहे. महापालिका तसेच कामगार आयुक्त कार्यालयाने घरेलू कामगारांना कामावर जाण्यास हरकत नाही, असे स्पष्ट केल्यावरही अनेक सोसायट्यांनी त्यांना प्रवेशद्वारे खुली केलेली नाहीत. मात्र, कोथरूडमधील या तीन प्रमुख सोसायट्यांनी खबरदारी घेऊन आणि स्वतःची आचारसंहिता तयार करून घरेलू कामगारांना प्रवेश दिला आहे.

पुणेकरांना जबर धक्का : दिवसभरातील रुग्णसंख्या पोहोचली तीनशेपर्यंत!

मात्र, पुणे जिल्हा घरकामगार संघटनेच्या अध्यक्षा किरण मोघे यांनी सांगितले की, कामावर जाण्यासाठी संबंधित महिला तयार आहेत आणि काम देणारीही महिला तयार आहे, मात्र सोसायटी त्यात अडसर ठरत आहे. मात्र, घरेलू कामगार या झोपडपट्टीतून येतात, त्या एकाच दिवशी अनेक ठिकाणी काम करतात, त्यांच्यापासून धोका आहे, असे म्हणत काही सोसायट्यांनी त्यांना प्रवेश दिलेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The doors of the Society opened to domestic workers