
याआधी रोज 1300 ते 1400 नागरिकांची तपासणी केली जात होती. त्याची संख्या वाढविल्याने नव्या रुग्णांचा शोध लागत असल्याचे महापालिका सांगत आहे.
पुणे : "बापरे...पुण्यात कोरोनाचे तीनशे रुग्ण सापडलेत ? होय, जवळपास तितकेच म्हणजे, शुक्रवारी एका दिवसात 291 नवे रुग्ण सापडलेत. तर; याच दिवसभरात पुन्हा 14 रुग्णांचा जीव गेला आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
या नव्या उच्चांकाने पुणेकरांना खूपच काळजी घेण्याचा सांगावाही धाडला आहे. आजपर्यंतच्या नोंदीत सर्वाधिक नवे रुग्ण आणि मृतांचा समावेश शुक्रवारी झाला आहे. रुग्ण वाढीचे तेच कारण म्हणजे, तपासणी वाढल्याचे सांगण्यात आले. नव्या आकड्याने घाबरलेल्या पुणेकरांना 189 कोरोनामुक्तांनी थोडाफार दिलासा मिळाला दिला आहे.
- कोरोना संबंधातील 10 महत्त्वाच्या बातम्या; वाचा एका क्लिकवर
कोरोनाचा हाहाकार नवे रुग्ण, मृतांपर्यंतच थांबला नाही, या आजाराच्या 169 रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यातील 49 जण तर व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्यातील कोरोना मृतांमध्ये 36 वर्षांपासून 40 आणि 60 पेक्षा अधिक वयाच्या रुग्णांचा समावेश असल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे. या मृतांना उच्चरक्तदाब, मधुमेह, अस्थमा, हदयाचा त्रास असल्याचेही तपासण्यांमधून पुढे आले आहे.
आतापर्यंत सुमारे 38 हजार 770 नागरिकांची तपासणी झाली आहे. त्यातील 4 हजार 398 जणांना कोरोना झशला होता. त्यापैकी 2 हजार 371 रुग्ण बरे झाले आहेत. तर 241 जणांचा मृत्यू झाला आहे.
- 'परीक्षा रद्द करण्याच्या मुद्यावर चर्चा करा'; कुलगुरूंकडे कुणी केली ही मागणी!
पुणे शहरातील लॉकडाउनमध्ये सवलती जाहीर झाल्यपासून म्हणजे, गेल्या 10-12 दिवसांपासून रोजच्या रुग्ण संख्येत मोठी भर पडत आहे. आतापर्यंत एका दिवसांत सर्वाधिक 208 रुग्ण आढळून आले आहेत. त्याआधी 201, 202 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर मात्र, दोन ही संख्या थोडी कमी झाल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला. मात्र, ही संख्या शुक्रवारी 291 पर्यंत गेल्याने सर्वत्र प्रचंड घबराट परसरली आहे. सध्या रोज 1 हजार 735 जणांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी केली जात आहे.
- कोथरुडकरांनो सावधान! कोरोनाचा वाढतोयं धोका...
याआधी रोज 1300 ते 1400 नागरिकांची तपासणी केली जात होती. त्याची संख्या वाढविल्याने नव्या रुग्णांचा शोध लागत असल्याचे महापालिका सांगत आहे.
- पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा