आयटीआय प्रवेशासाठी दुप्पट अर्ज

Double application for ITI admission
Double application for ITI admission
Updated on

पुणे : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेश घेण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून (डीव्हीईटी) राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला यंदाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आयटीआयला प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तीन लाखांच्याही पुढे गेली आहे. 

विद्यार्थ्यांच्या खात्यात आठवडाभरात पैसे जमा होणार; धनंजय मुंडे यांची घोषणा​

यंदा आयटीआय प्रवेशासाठी एकूण एक लाख ४५ हजार ६३२ जागा उपलब्ध आहेत. आयटीआय प्रवेश क्षमतेच्या दुप्पट अर्ज सध्या आले आहेत. त्यामुळे यंदा आयटीआय प्रवेशाच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता नाही.

आयटीआय प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सोमवारपर्यंत (ता. ३१) अंतिम मुदत आहे. आतापार्यंत तीन लाखांहुन अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. अडीच लाखांहुन अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरून पूर्ण केले आहेत. राज्यातील सरकारी आणि खासगी आयटीआयमधील प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. 

राज्यातील आयटीआयची सद्यस्थिती:
- ३५८ तालुक्यात एकूण ४१७ आयटीआय
- राज्यातील एकूण प्रवेश क्षमता : एक लाख ४५ हजार ६३२
- आदिवासी भागात ६१ संस्था
- अनुसूचित जाती व नव बौध्दांच्या मुलामुलींसाठी चार उच्च स्तर संस्था
- अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र दोन संस्था
- ४३ शासकीय संस्था
- २८ आदिवासी आश्रमशाळा आयटीआय
- खासगी आयटीआय : ५३८ 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune PMC may expand Education Committee powers
PMC’s DBT plan for sanitation equipment hits a roadblock
Socialist thinker Ratnakar Mahajan passes away in Pune.
Rahul Kul leads Vidarbha review on jobs and development.
Marathi News Esakal
www.esakal.com