‘सीईटी’ परीक्षेसाठी आता दुप्पट शुल्क 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

 राज्य सामाईक परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठीचे शुल्क निश्‍चित करण्यात आले आहे. दोन्ही ‘पीसीएम’ आणि ‘पीसीबी’ या दोन्ही ग्रुपची परीक्षा देणाऱ्यांना दुप्पट शुल्क आकारले जाणार आहे. 

पुणे - राज्य सामाईक परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठीचे शुल्क निश्‍चित करण्यात आले आहे. दोन्ही ‘पीसीएम’ आणि ‘पीसीबी’ या दोन्ही ग्रुपची परीक्षा देणाऱ्यांना दुप्पट शुल्क आकारले जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आगामी वर्षाच्या इंजिनिअरींग, औषधनिर्माण यासह इतर विज्ञान शाखेशी संबंधित अभ्यासक्रमांसाठी सीईटी सेलकडून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यासाठी सीईटी सेलने शुल्क निश्‍चित केले आहे. पीसीबी किंवा पीसीएम यापैकी कोणत्याही एका ग्रुपमधून परीक्षा देताना खुल्या गटासाठी ८०० रुपये तर, आरक्षित गटासाठी ६०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. जर विद्यार्थी दोन्ही गटातील अभ्यासक्रमाची परीक्षा देणार असेल, तर खुल्या गटासाठी १ हजार ६०० रुपये तर आरक्षित गटासाठी १ हजार २०० रुपये शुल्क आकारले जाईल. हे शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थांनी ऑनलाईन शुल्क भरण्यापूर्वी अर्ज व्यवस्थित तपासून घ्यावा, त्यानंतर पैसे भरावेत, असे आवाहन सीईटी सेलचे प्रमुख संदीप कदम यांनी केले आहे. 

दृष्टिहीनांसाठी ‘डोळस’ प्रयोग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: double the fee for the CET exam

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: