
पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य शासनाने मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता ‘बीएलओ’ यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपयांऐवजी बारा हजार इतके मानधन मिळेल. तर त्यांच्या कामावर देखरेख ठेवणाऱ्या केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक यांच्या पगारातदेखील सहा हजाराने वाढ केली आहे. त्यामुळे त्यांना प्रतिवर्षी बारा हजार रुपयांऐवजी १८ हजार रुपये इतके मानधन मिळणार आहे.