Pune News : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवले; पुण्यातील घटना
Pune Crime : पैशासाठी सासरी सातत्याने होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून साजिदा शेख या २३ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली असून पोलिसांनी पतीसह सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुणे : माहेरून पैसे न आणल्याने सासरी होत असलेल्या छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना दत्तवाडी परिसरात सोमवारी (ता. ८) सकाळी दहा वाजता घडली.