
वारजे : प्रभाग क्रमांक ३१ मधील वारजे जकात नाका ते तिरुपतीनगर दरम्यानच्या डीपी रस्त्याचे विस्तारीकरण काम गेल्या पंधरा दिवसांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, त्यांनी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे तातडीने हे काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे.