डॉ. आंबेडकरांनी तळागाळातील माणसाला स्वाभिमानाची जाणीव करून दिली : दिलीप वळसे-पाटील

डॉ. आंबेडकरांनी तळागाळातील माणसाला स्वाभिमानाची जाणीव करून दिली : दिलीप वळसे-पाटील

मंचर : सर्व धर्मातील लोकांच्या मदतीसाठी कार्य करणारे राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील सर्वसामान्य माणूस सर्व शक्तीनिशी जागा केला. त्याला आत्मसन्मान, स्वाभिमान, अस्मिता व सामर्थ्याची जाणीव करून दिली. मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले .हक्काने जगण्याची शिकवले. त्यासाठी संघर्ष , सत्याग्रह करून समता व न्याय समाजात निर्माण केला. एक व्यक्ती एक मत मूल्य आणि त्यांची एकच किंमत हा सिद्धांत दिला. लोकशाही आणि राज्यघटना जगात आदर्श मानली जाते. डॉ. आंबेडकर यांचे कार्य प्रेरणादायी आहे.त्यांचे विचार भावी पिढ्यांना सतत मार्गदर्शन करीत राहतील, असे राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. 

मंचर (ता.आंबेगाव) येथे महानिर्वाण  दिनानिमित्त डॉ.आंबेडकर भवन येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे व भगवान गौतम बुध्द यांच्या प्रतिमेचे  पूजन व अभिवादन वळसे पाटील यांनी केले. यावेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा,पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे.भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे,शिवसेनेचे नेते राजाराम बाणखेले,बाळासाहेब बाणखेले, आंबेगाव तालुका कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजू इनामदार ,कुलस्वामिनी पतसंस्थेचे अध्यक्ष शंकर पिंगळे ,वसंतराव बाणखेले ,अरुणा थोरात, कविता थोरात उपस्थित होत्या.

वळसे पाटील म्हणले “सामाजिक सुधारणा होण्यासाठी मुळात सामाजिक विषमतेचा प्रश्न सुटला पाहिजे. कुटुंबाच्या प्रगतीसाठी शिक्षण महत्वाचे आहे.हे  डॉ.बाबासाहेबांनी कृतीतूनच समाजाला पटवून देण्याचे काम केले.सर्व समाजाला दिशा दाखविण्याचे काम त्यांनी केले.”

पंचशील प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र देठे , माया देठे, कमल देठे, सोनाबाई देठे, फकीरा देठे ,संतोष देठे यांनी व्यवस्था पहिली.आंबेडकर भवन शेजारी असलेली देठे कुटुंबांची जागा आंबेडकर भवन साठी विनामुल्य देण्याची तयारी आहे.या जागेत जिल्हा परिषद किंवा राज्य शासनाने निधी उपलब्ध करून  दिल्यास सभागृह होऊ शकेल असे महेंद्र देठे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com