मोदींवरील वादग्रस्त पुस्तकावर अमोल कोल्हे काय म्हणाले?

टीम ई सकाळ
Monday, 13 January 2020

एखाद्या बाजारू लांगूलचालन करणाऱ्या पुस्तकाविषयी प्रतिक्रिया देण्याची गरज नाही परंतु काळ सोकावू नये, म्हणून एवढंच सांगतो की दगडाला शेंदूर फासला जाताना अनेकदा पाहिला आहे पण सूर्याचं आवरण घालण्याचा प्रयत्न केला तर भस्मसात व्हाल! असा इशाराच कोल्हेंनी दिला आहे.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या वादग्रस्त पुस्तकावर शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. एखाद्या बाजारू लांगूलचालन करणाऱ्या पुस्तकाविषयी प्रतिक्रिया देण्याची गरज नाही परंतु काळ सोकावू नये, म्हणून एवढंच सांगतो की दगडाला शेंदूर फासला जाताना अनेकदा पाहिला आहे पण सूर्याचं आवरण घालण्याचा प्रयत्न केला तर भस्मसात व्हाल! असा इशाराच कोल्हेंनी दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोल्हे म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, स्वातंत्र्याची ओळख आहे, रयतेच्या राज्याचे प्रतीक आहे! ते एकमेवाद्वितीय आहेत. कैक जन्म घेतले तरी त्यांची तुलना होऊ शकत नाही. हा अंगार साडेतीनशे-पावणेचारशे वर्षांनंतरही महाराष्ट्राच्या मनामनात धगधगत आहे. याचं भान ठेवायला हवं. नाहीतर याची जाणीव करून द्यावी लागेल असेही कोल्हे म्हणाले.

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत भारतीय जनता पक्ष कार्यालयात काल (ता.१२) 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाशन केले. यानंतर मोठा वादही झाला. भाजपनेते जय भगनवान गोयल यांनी हे पुस्तक लिहले असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या नेत्यांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Amol kolhe Comment On aaj ke shivaji Narendra Modi Book