
Dr Amol Kolhe : देशात शिरूर मतदारसंघातील रस्ते वाहतुकीसाठी सर्वाधीक निधी; डॉ. अमोल कोल्हे
हडपसर : मुलूख मारायचा असेल तर गड सांभाळणारी माणसे महत्वाची असतात. आपल्या सारखे कार्यकर्ते ती भूमिका निभावत असल्यामुळेच मला संसदेत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व चांगल्याप्रकारे करता येत आहे. त्याची पावती म्हणून मला दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळू शकला आहे, अशी भावना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त करताना खासदार डॉ. कोल्हे बोलत होते.
खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, "आज देशातील सर्वच लोकसभा मतदारसंघापैकी रस्ते वाहतुकीसाठी सर्वाधीक बावीस हजार कोटी रूपयांचा निधी मिळणारा केवळ शिरूर मतदारसंघ आहे. पुणे ते नगर, नाशिक महामार्ग, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे आदी मोठे प्रकल्प मार्गी लागला आहेत.
राज्यातील सरकार लोकहिताच्या कामांकडे दुर्लक्ष करीत आहे. राजकीय व्यक्तींसह सर्वसामान्य माणसालाही वेठीस धरीत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले जात नाही.' सुरेश घुले म्हणाले, "पंतप्रधानांनी कौतुक करावे इतके अभ्यासू संसद प्रतिनिधी आपल्याला लाभले आहेत. मतदारसंघातील अनेक मोठ्या प्रकल्पांना त्यांच्यामुळे गती मिळाली आहे. कार्यकर्त्यांनी त्यांच्या कामातून प्रेरणा घ्यावी.'
पक्षाचे मतदार संघाचे निरीक्षक एडवोकेट औदुंबर खुणे पाटील, माजी महापौर वैशाली बनकर, माजी उपमहापौर निलेश मगर, प्रदेश सरचिटणीस अजित घुले, माजी नगरसेवक फारूक इनामदार, योगेश ससाणे, अशोक कांबळे, सुनील बनकर, शिवाजी पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले, जितीन कांबळे, सुरेश घुले,
डॉ. सुहास लांडे, डॉ. लालासाहेब गायकवाड, प्रशांत घुले, शिवाजी खलसे, राजेंद्र गारूडकर, वासंती काकडे, पूनम पाटील, सागर भोसले, संजीवनी जाधव, रोहिणी तुपे, सविता मोरे, प्रतिमा तुपे, दिपाली कवडे, शीतल शिंदे, वैष्णवी सातव, स्वाती चिटणीस, निलेश घुले, राहुल घुले, विक्रम जाधव, रुपेश तुपे, कलेश्वर घुले, मंगेश मोरे आदी यावेळी उपस्थित होते. मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष अमर तुपे, सेवादल अध्यक्ष योगेश जगताप यांनी संयोजन केले.