Amol Kolhe: कोंडी सोडविण्यासाठी आराखडा करा : डॉ. अमोल कोल्हे
Pune Traffic: मुंढवा व केशवनगर भागातील नागरिकांना वाहतूक कोंडी आणि कचरा, दूषित पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यावर सर्वंकष विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले.
पुणे : ‘मुंढवा व केशवनगर भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वंकष विकास आराखडा (डीपीआर) तयार करा,’ अशा सूचना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.