Dr. Baba Adhav
sakal
- अंबर आढाव (डॉ. बाबा आढाव यांचे धाकटे चिरंजीव)
डॉ. बाबा आढाव यांचं वय ९६ वर्षांचं, असामान्य सामाजिक कार्याने लखलखणारं, तत्त्वनिष्ठ, समर्पित आयुष्य. शेवटच्या काही वर्षांत कर्करोगामुळे सतत रुग्णालय, अतिदक्षता विभाग असं सुरू होतं. शरीर थकत होतं, कमकुवत होत होतं; पण शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्या डोक्यात आणि मनात एकच गोष्ट चालू होती... ती म्हणजे कष्टकरी माणूस, असंघटित कामगार, त्याचा सन्मान, त्याचे हक्क!