Dr Baba Adhav : कायम मन की बात सांगता, आता "जन की बात' ऐकण्याचीही तयारी ठेवा; डॉ.बाबा आढाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर डॉ.बाबा आढाव यांची टिका, महाराष्ट्र सन्मान परिषदेस सुरुवात
Dr Baba Adhav
Dr Baba AdhavSakal
Updated on

पुणे : "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकांना कायम "मन की बात' सांगतात, पण त्यांनी आता "जन की बात' ही ऐकण्याचीही तयारी ठेवावी. पंतप्रधान घरोघरी तिरंगा लावण्याचे आवाहन करतात, त्यापुढे जाऊन आता पंतप्रधानांनी "घरोघरी तिरंगा, घरोघरी संविधान' हे सांगण्याची गरज आहे.'' अशा कडक शब्दात कष्टकरी व कामगारांचे नेते डॉ.बाबा आढाव यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली.

विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्यावतीने टिळक स्मारक येथे "महाराष्ट्र सन्मान परिषदे'च्या पहिल्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, शाहीर संभाजी भगत व्यासपीठावर उपस्थित होते.

शिक्षक व पदवीधर निवडणुकांच्या निकालाचा आढावा घेत डॉ.आढाव म्हणाले, ""लोक भुमिका घेतात, राजकारण्यांपेक्षाही जनता दोन पावले पुढे असते, हे या निवडणुकांच्या निकालांवरुन स्पष्ट झाले आहे. ते भ्रमामध्ये आहेत, जनतेला बदलायचे आहे हे दिसू लागले आहे.

एकीकडे अदानींचे जगात मार्केट वाढतेय, तर दुसरीकडे देशाचा क्रमांक घसरत आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मुल्यांशी आमची बांधिलकी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला तलवार दिली, महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांनी पाटी-पेन्सील दिली, तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मतदानाचा अधिकार दिला. हि वाटचाल रोखण्याचे काम सध्या सुरु आहे. आता भ्रमात राहू नका, "महाराष्ट्र सन्मान परिषदे'च्या माध्यमातुन एकजुटीने लढा द्या.''

अंधारे म्हणाल्या, "छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांना डॅमेज करण्याचे काम नियोजितपणे केले जात आहे. महापुरुषांच्या प्रतिमांना मोडीत काढून ते हेडगेवार, गोळवलकर यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोहन भागवत संप्रदायाचे हे मनसुबे उधळवून लावण्याचे काम महाराष्ट्र सन्मान परिषदेच्या माध्यमातुन केले जाणार आहे.

याच पद्धतीने त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडले. उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल देशमुख यांच्या प्रतिमांना डॅमेज केले आहे. कचऱ्यात टाकण्यात येणारे धान्य ते गरीबांना वाटून त्यांची फसवणूक करीत आहे. शिवाजी महाराजांविषयी भगतसिंग कोशयारी वादग्रस्त बोलूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याविरुद्ध ठराव मांडण्याचा किंवा त्यांच्याबाबत केंद्राला पत्र पाठविण्याचे धाडस दाखविले नाही.'' महेश शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत जगताप यांनी केले, तर सूत्रसंचालन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी केले.

संभाजी महाराज स्वराज्यरक्षकच ! - जितेंद्र आव्हाड

"शिव, शाहू, फुले आंबेडकर हे सुत्र उध्वस्त करण्याचे काम सध्या सुरु आहे. हा एक प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद आहे. एखादा समुदाय आपला विचार मानत नसेल, तर त्या समुदायाच्या महापुरुषांना उध्वस्त करण्याचे काम या सांस्कृतिक दहशतवादाच्या माध्यमातुन केले जात आहे. संभाजी महाराज हे हुशार उच्चविद्याविभुषीत होते.

ते गादीवर बसले तर जगातील सर्वात मोठे योद्धे ठरतील, हि भिती त्यांना होती. एकही युद्ध न हारलेल्या संभाजी महाराजांच्या जीवावर शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील काहीजण उठले होते. तरीही त्यांनी त्यांना माफ केले. स्वराज्यासाठी ते अखेरपर्यंत लढले, म्हणूनच ते धर्मरक्षक नव्हे, तर "स्वराज्यरक्षक'च आहेत. संभाजी महाराजांना घरातल्यांची गद्दारीच कशी नडली, ते गद्दार कोण होते हे मद्रास येथील फ्रान्सिस मार्टीन याने आपल्या दस्तऐवजामध्ये लिहीले आहे.'' असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com