dr. baba adhav
sakal
- डॉ. अभिजित वैद्य
माझे व बाबांचे संबंध कौटुंबिक, वैचारिक व डॉक्टर, असे तीन पातळ्यांवर होते. वैद्य घराण्याशी बाबांचे नाते माझ्या जन्माच्या आधीपासून आहेत. भाई वैद्य हे बाबांना दोन वर्षे ज्येष्ठ. भाई व बाबा हे लहानपणी राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते; तर तरुण वयात समाजवादी पक्षाचे काम करायला लागले, तेव्हापासून भाई व बाबांचे नाते राष्ट्र सेवा दलाचे सैनिक म्हणून परिचित होते.